VIDEO | पंडित नेहरूंच्या स्मृतीदिन | जयंत पाटलांनी शेअर केला वाजपेयींचा ‘तो’ व्हिडीओ

मुंबई, २७ मे | भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त अनेक दिग्गजांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. देशाच्या आंतरराष्ट्रीय जडणघडणीत नेहरूंचा सिंहाचा वाटा होता. मात्र २०१४ नंतर आलेल्या मोदी सरकारने आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्या अज्ञानातून त्यांना केवळ बदनाम करण्याचा घाट घातल्याचं पाहायला मिळालं आहे.
“Evil unchecked grows, evil tolerated poisons the whole system.”
Remembering the wise words of Pandit Jawaharlal Nehru on his death anniversary. pic.twitter.com/aEgHM7hx6T
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 27, 2021
विशेष म्हणजे मागील काही वर्षांत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बदनामीची एक शिस्तबद्ध मोहीम या देशात एका विशिष्ट वर्गाकडून चालवली जात आहे. परंतु या वर्गाकडून पंडित नेहरूंची उंची कितीही कमी करायचा प्रयत्न केला, तरीही ती कमी होणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कायमच या देशामध्ये सन्मान होत राहिला व यापुढेही होत राहील”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाला देखील डिवचले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे या देशाच्या संसदेचे सदस्य होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी भाषणात असे म्हटले आहे की, “भय व भूकमुक्त जगाचे एक स्वप्न उध्वस्त झाले असून, भारतमाता आज शोकाने भरून गेली आहे. भारतमातेने तिचा आवडता राजकुमार आज गमावला आहे. जागतिक शांततेचा पुरस्कार करणारा संरक्षक आता आपल्यात नाही. सूर्यास्त झाला असून आपल्याला आपला रस्ता शोधायला हवा. जरी आमच्यामध्ये मतभेद असले तरीही आम्हाला पंडितजींची आदर्श मूल्ये, देशाप्रतीचे प्रेम आणि असीम धैर्याबद्दल केवळ आदरच आहे”, ही आठवण करुन देताना जयंत पाटील यांनी भाजपला चिमटा काढला आहे.
आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏
Tributes to the maker of modern India Pandit Jawaharlal Nehru on his death anniversary. #JawaharlalNehru pic.twitter.com/tvBpmsDXEQ
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 27, 2021
News English Summary: What is special is that in the last few years, a disciplined campaign to discredit Pandit Jawaharlal Nehru has been carried out by a certain class in this country. But no matter how much Pandit Nehru tried to reduce the height of this class, it will not decrease. Pandit Jawaharlal Nehru has always been respected in this country and will continue to be so, ”said Jayant Patil, State President, NCP and Water Resources Minister.
News English Title: Minister Jayant Patil shares Atal Bihari Vajpayees video on Pandit Jawaharlal Nehru’s memorial day news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON