22 April 2025 6:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन संस्थेचे भाजप व नागपूर कनेक्शन उघड

Maratha reservation

कोल्हापूर, २७ मे | मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला भाजपा पाठिंबा देईल या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

दुसरीकडे यावरून आता काँग्रेसकडून भाजपवर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. “मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ या संस्थेचे व त्यांच्या पदाधिका-यांचे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर कनेक्शन उघड झाले आहेत. यात भाजप पदाधिकारीच अग्रेसर असल्याने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत आरक्षण विरोधी लोकं व संस्थांना रसद पुरवून भाजपानेच मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे का?”, असा संतप्त महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

सावंत यांनी काही पुरावे सादर करताना म्हटलं की, “मराठा समाजाने कोल्हापूरला ज्या संस्थेविरोधात आंदोलन केले त्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात निकराने विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation संस्थेची स्थापना भाजपाच्या इशाऱ्यावर नागपूर येथे २०१९/२० करण्यात आली का?. या संस्थेचे विश्वस्त नागपूरचे असून भाजपा आणि संघाशी संबंधित आहेत. संस्थेचे संस्थापक डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी असून त्याचाच पत्ता संस्थेला दिला आहे. ऑक्टोबर २०२० ला भाजपा वैद्यकीय आघाडीचा पूर्व विदर्भाचा संयोजक म्हणून फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी त्यांची नेमणूक केली. संस्थेचे अनिल लद्दड सारखे इतर विश्वस्त भाजपा कार्यक्रमात सहभागी असतात.

जनतेची दिशाभूल करण्यासाठी ५ जूनला जाहीर करण्यात आलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या भाजप पुरस्कृत आंदोलनामुळे जर राज्यात कोरोनाचा हाहाकार उडाला तर त्याला सर्वस्वी ‘सुपर स्प्रेडर भाजप’ जबाबदार असेल”, असाही इशारा यावेळी महाराष्ट्र काँग्रेसकडून देण्यात आला आहे. सचिन सावंत याविषयी पुढे भाजपवर आरोप करताना म्हणाले की, “भाजपची मानसिकता संघ विचारधारेप्रमाणेच आरक्षण विरोधी आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे असा दिखावा करायचा आणि प्रत्यक्षात मात्र आरक्षण मिळू नये म्हणून मोहिमा चालवायच्या ही भाजपची कार्यपद्धती आहे.” आपल्या पापांचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा भाजपचा प्रयत्न !

सचिन सावंत पुढे असेही म्हणाले की, “भाजपचे केंद्रातील मोदी सरकार आणि फडणवीस सरकार यांच्यामुळेच मराठा आरक्षणाला अडथळा निर्माण झाला हे स्पष्ट असताना भाजप जनतेची दिशाभूल करून आपल्या पापांचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न करत आहे.”

 

News English Summary: Save Merit Save Nation, an organization against which the Maratha community agitated in Kolhapur against the Maratha reservation in the Supreme Court, was established in Nagpur in 2019/20 at the behest of the BJP. The trustee of this organization is from Nagpur and is associated with BJP and Sangh said congress spokesperson Sachin Sawant news updates.

News English Title: Save Merit Save Nation an organization against Maratha Reservation fighting in court against Maratha Reservation said Sachin Sawant news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या