22 November 2024 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

OTT प्लॅटफॉर्म, ऑनलाईन न्यूज पोर्टलला सरकारची 15 दिवसांची डेडलाईन | गाइडलाइन्सवर काय केले सांगावे

OTT platform and Digital news

नवी दिल्ली, २७ मे | केंद्र सरकारने सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी माहिती व प्रसारण विभागाने डिजिटल माध्यमांसह ओटीटी प्लॅटफॉर्मला 15 दिवसांची डेडलाईन दिली आहे. त्याअंतर्गत अशा कंपन्यांना सांगावे लागेल की नव्या मार्गदर्शक सूचनांच्या बाबीत काय केले गेले.

25 फेब्रुवारी रोजी केंद्रातील मोदी सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि नियम कठोर केले. सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यासाठी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप यासारख्या सोशल मीडिया कंपन्यांना 3 महिने दिले होते. केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वाची अंतिम मुदत 25 मे रोजी संपली.

अशा परिस्थितीत, केंद्राची नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू न करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतात बंदी घालण्याचा धोका आहे. यापूर्वी टूलकिट वाद आणि सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वांविषयी गुरुवारी ट्विटरने म्हटले आहे की, सरकारकडे मुदतीची अंमलबजावणी करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे.

दरम्यान, बुधवारी या नियामावलीवरोधात व्हॉट्सअ‍ॅपने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी निवेदनाद्वारे ही प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयात जाण्याची व्हॉट्सअ‍ॅपची कृती चुकीची असल्याचे सरकारने म्हटले होते. तसेच नियम पालनाबाबत स्थिती अहवाल सादर करण्याची सूचना केंद्र सरकारने समाजमाध्यम कंपन्यांना बुधवारी केली. नव्या नियमावलीनुसार नेमलेल्या मुख्य अनुपालन अधिकारी, निवासी तक्रार-निवारण अधिकारी आणि संपर्क अधिकारी यांचा तपशील देण्याची सूचनाही केंद्राने या कंपन्यांना केली आहे.

 

News English Summary: The central government has started taking strict steps to comply with social media guidelines. On Thursday, the Information and Broadcasting Department set a 15-day deadline for the OTT platform, including digital media. Under it, such companies will have to be told what has been done with regard to the new guidelines.

News English Title: Union govt deadline to OTT platform and Digital news portals over new guidelines news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x