19 April 2025 8:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Health First | नखे चावण्याची सवय आहे? | आरोग्यास इतकी घातक ठरेल

Chewing nails habit

मुंबई, २७ मे | काही लोकांना आपली नखे चघळण्याची सवय असते. त्यांना त्याचे नुकसान माहीत असेत परंतु तरीही ते स्वत:ला रोखू शकत नाहीत. जर तुम्हालाही नखे चघळण्याची चुकीची सवय असेल तर आजपासून सोडून द्या, अन्यथा ते आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकते.

जर आपण नख चघळत असाल तर तुम्हाला घरातील मंडळी आणि मित्र आणि नातेवाईकांनी तुम्हाला टोकलं असेल. आपणास हे समजले आहे की नखे चावणे चुकीचे आहे. परंतु आरोग्यामुळे त्याचे कोणते गंभीर नुकसान होऊ शकते हे कदाचित माहिती नाही. जीवनशैलीची ही चुकीची सवय आपल्या त्वचेपासून आपले दात खराब करु शकते.

संसर्ग होण्याचा धोका वाढतो:
नखं चावण्यामुळे पॅरोनिशिया नावाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. पॅरोनिशियाच्या लक्षणांमध्ये नखांभोवती सूज येते, त्वचा लाल होते, वेदना होतात. जर संक्रमण जिवाणूंचे असेल तर पू-भरलेले फोड येऊ शकतात. तसंच जर आपण ती नखं चावत आहात ज्यात विषाणू असलेले फोड असतील तर याचे संक्रमण इतर ठिकाणी देखील पसरू शकतं.

दातांचा आकार खराब होऊ शकतो:
नखे चावण्यामुळे दात हलू शकतात, ज्यामुळे ब्रेसेसची आवश्यकता लागू शकते. नखं चावण्यामुळे दात तुटू शकतात किंवा दात कमकुवत होऊ शकतात. सूक्ष्मजंतू हिरड्या संक्रमित करतात किंवा जळजळ निर्माण शकतात. याव्यतिरिक्त बोटांमध्ये किंवा नखांवर असलेले जीवाणू तोंडात येऊ शकतात आणि तोंडाला दुर्गंधी येऊ शकते.

विषारी पदार्थांचा धोका:
नखांवर नेलपॉलिश लावत असाल तर लगेचच नखं चावण्याची सवय सोडा. नेलपॉलिशमध्ये भरपूर प्रमाणात विषाक्त पदार्थ असतात. नेल पॉलिशमध्ये अशी रसायनं असतात जे तोंडात गेल्यास हानिकारक ठरू शकतात.

पोटाच्या समस्या:
याबाबत तज्ज्ञ सांगतात की, नखं चावण्याने त्यात असलेले जीवाणू तोंडात जातात आणि नंतर ते पोटात जातात. यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. या सूक्ष्मजंतूंच्या संसर्गामुळे देखील ओटीपोटात वेदना, अतिसारसारख्या समस्या होऊ शकतात. लहान मुलांमध्येही ही सवय असल्यास पचन आणि अंतर्गत आजार होण्याचा धोका जास्त असतो.

त्वचेचे नुकसान:
नख चावण्याच्या सवयीमुळे बॅक्टेरियाचा संसर्ग (Bacterial Infection) होऊ शकतो. यामुळे चेहर्‍यावर लालसरपणा आणि सूज येऊ शकते. एवढेच नव्हे तर काही लोकांना नखांखाली ​​ बॅक्टेरियातील संसर्ग देखील होतो. यामुळे, पू तयार होण्यास सुरुवात होते आणि असह्य वेदना होऊ शकते. मग बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे औषध घेणे मजबूरी होते.

अशी सोडवा नखं चावण्याची सवय:
याबाबत तज्ज्ञ सांगतात की, नखांमुळे होणारा बुरशीजन्य संसर्ग हा नखाच्या रोगांपैकी एक सामान्य रोग आहे. नखांमध्ये बुरशीजन्य संसर्ग असल्यास नखांच्या टोकाला पांढरे किंवा पिवळे डाग दिसतात. नखांमध्ये हा संसर्ग रोखण्याचा एक मार्ग म्हणजे नखं दातांनी मुळीच चावू नयेत. या सवयीपासून मुक्त होण्यासाठी नखांवर कारल्याचा किंवा कडुलिंबाचा रस लावा. ही कडू चव नखे चावण्यापासून वाचवते. जर ताणतणाव असेल तर नखं चावणं टाळण्यासाठी आपले हात व्यस्त ठेवा आणि ते तोंडापासून दूर ठेवण्यासाठी चेंडूसह खेळण्याचा प्रयत्न करा.

 

News English Summary: Some people have a habit of chewing their nails. They know the damage, but they can’t stop themselves. If you also have a bad habit of chewing nails, quit today, otherwise it can cause serious harm to your health.

News English Title: Chewing nails habit is dangerous for health news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या