22 November 2024 11:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

VIDEO | पैलवान सागर मर्डर केस | सुशील कुमारचा छत्रसाल स्टेडिअममधील मारहाणीचा VIDEO आला समोर

नवी दिल्ली, २८ मे | छत्रसाल स्टेडियममध्ये ज्युनिअर राष्ट्रीय पैलवान सागर रानाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 2 वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यात ऑलिम्पियन सुशील कुमार मित्रांसोबत सागरला हॉकी स्टिकने मारहाण करताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सुशील कुमारने स्वत: मित्राच्या मोबाइलवरून हा व्हिडिओ शूट करून घेतला होता, जेणेकरून कुस्तीच्या सर्कीटमध्ये त्याचा वचक राहील. व्हिडिओमध्ये, 23 वर्षीय सागर धनकड रक्ताने माखलेला दिसत आहे.

माजी कनिष्ठ राष्ट्रीय विजेत्या सागरला सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी सुमारे २५ मिनिटे मारहाण केली होती. पोलीस नियंत्रण कक्षात माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा ही मारहाण थांबवण्यात आली. सुशील कुमारने शहरातील कुस्ती क्षेत्रात आपली दहशत पसरवण्यासाठी हत्येचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपी सुशील कुमार व अन्य 3 जणांनी त्याला घेराव घातला. प्रत्येकाच्या हातात हॉकी स्टिक दिसत आहे. असे सांगितलं जात आहे की, हा व्हिडिओ स्वत: सुशीलचा साथीदार प्रिन्स दलालने बनवला होता. त्याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. याशिवाय सुशील आणि त्याचा पीए अजय यांच्यासह आणखी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सुशीलचा आणखी एक साथीदार रोहित करोर याला अटक करण्यात आली. तर, 4 आरोपी नीरज बवाना गँग आणि कला-असोदा गँगचे सदस्य आहेत.

आतापर्यंतच्या चौकशीत सागरच्या मृत्यूचे कारण मॉडल टाऊनचा एक फ्लॅट सांगितला गेला. तो रिकामा केल्यानंतर दोन महिन्यांच्या भाड्यावरून वाद झाला होता. मात्र ही कथा गुन्हे शाखेला मान्य नाही. यामुळे दोन्ही आरोपींची चौकशी करून घटनेचे खरे कारण जाणून घेतले जात आहे. सागरसोबत त्याचा कधीपासून वाद होता हे सुशीलकडून जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. सागर सुशीलला गुरू मानत असतानाही असे काय घडले की एवढी मोठी घटना घडली. छत्रसाल मैदानात घटनेच्या रात्री सुशीलसोबत कोण होते?

 

News English Summary: Some photos and videos of two-time Olympic medalist Sushil Kumar, who was arrested in connection with the murder of junior national wrestler Sagar Rana at Chhatrasal Stadium, have surfaced. It shows Olympian Sushil Kumar with friends hitting Sagar with a hockey stick.

News English Title:  Video of Olympian Sushil Kumar attacking wrestler Sagar Rana who died later news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x