22 November 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

मराठा आरक्षण | संभाजीराजेंनी सुचवलेले ते ३ पर्याय सत्ताधारी-विरोधकांना मान्य | काय आहेत पर्याय?

Maratha reservation

मुंबई, २८ मे | सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातून नाराजी प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयानंतर भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वपक्षांच्या नेत्यांची दिल्लीत गोलमेज परिषद आयोजित करणार, तसेच आता अॅक्शन घेण्याची वेळ आली आहे, असे म्हटले.

संभाजी राजे पुढे म्हणाले की, “सकल मराठा समाजाच्या वतीने मी बोलत आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात किंवा कोणता राजकीय अजेंडा घेऊन अजिबात आलेलो नाही. आमची एकच मागणी आहे की सकल मराठा समाजाला न्याय मिळावा. 2007 सालापासून मी महाराष्ट्र पिंजून काढला कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात मराठा समाजावर अन्याय होतोय यासाठी माझा हा लढा आहे.

तीन पर्याय सत्ताधारी-विरोधकांना मान्य:
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी संभाजी छत्रपती यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसमोर तीन पर्याय दिले आहेत. हे तिन्ही पर्याय त्यांनी मान्य केले आहेत. नंतर त्यांनी हे तीन पर्याय मान्य केले नाही तर त्याला तेच जबाबदार असतील असं ते म्हणाले. मराठा आरक्षण ही राज्य आणि केंद्राची जबाबदारी आहे. तुझं माझं करून चालणार नाही. इथं नवरा बायको म्हणूनच राहावं लागणार आहे. मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर कुटुंबासारखं वागावं लागेल. आता शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून व्हेटो काढावा लागेल. पण तो पूर्वीसारखा व्हेटो नसणार. तर व्हेटो म्हणजे गोड बोलून एकत्र येण्याचं काम करावं लागणार आहे, असं ते म्हणाले.

तीन पर्याय कोणते:

पहिला पर्याय:
राज्य सरकारने तात्काळ रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी. हा राज्य सरकारचाच विषय.

दुसरा पर्याय:
रिव्ह्यू पिटीशन टिकलं नाही तर क्युरिटिव्ह पिटीशन दाखल करावी. हा शेवटचा पर्याय आहे. पण हा पर्याय अपवादात्मक आहे. त्यासाठी भक्कम पुरावे घेऊनच कोर्टात जावं लागणार आहे.

तिसरा पर्याय:
342 अ’ च्या माध्यमातून आपण प्रपोजल केंद्राकडे देऊ शकतो. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देतील. त्यांना योग्य वाटलं तर ते संसदेकडे पाठवतील.

 

News English Summary: Sambhaji Chhatrapati has given three options to the ruling and opposition parties to maintain the Maratha reservation. They have agreed to all three options. He later said that if he did not accept these three options, he would be held responsible.

News English Title: MP Sambhaji Chhatrapati has given three options to the ruling and opposition parties to maintain the Maratha reservation news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x