22 November 2024 11:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

मराठा आरक्षण | सरकारनं त्या ५ गोष्टींवर निर्णय घ्यावा | अन्यथा ७ जूनला रायगडावरून आंदोलनाला सुरुवात

Maratha reservation

मुंबई, २८ मे | सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातून नाराजी प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयानंतर भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वपक्षांच्या नेत्यांची दिल्लीत गोलमेज परिषद आयोजित करणार, तसेच आता अॅक्शन घेण्याची वेळ आली आहे, असे म्हटले.

मनोगत सुरू करण्यापूर्वी मी स्पष्ट करतो की, सकल मराठा समाजाच्या वतीनं मी बोलतोय. कुठल्याही राजकीय पक्षाचा अजेंडा घेऊन आलेलो नाही. सकल मराठा समाजाला न्याय मिळायला हवा. छत्रपतींचा वंशज म्हणून सांगू इच्छितो की, जो महाराष्ट्र मी 2007 पासून पिंजून काढतोय, मराठा समाजावर जो अन्याय आज होतोय, त्याविरोधात हा लढा आहे, असंही त्यांनी सांगितलंय.

संभाजी राजे पुढे म्हणाले की, “सकल मराठा समाजाच्या वतीने मी बोलत आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात किंवा कोणता राजकीय अजेंडा घेऊन अजिबात आलेलो नाही. आमची एकच मागणी आहे की सकल मराठा समाजाला न्याय मिळावा. 2007 सालापासून मी महाराष्ट्र पिंजून काढला कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात मराठा समाजावर अन्याय होतोय यासाठी माझा हा लढा आहे.

7 जूनपर्यंत जर सरकारनं मी सांगितलेल्या पाच गोष्टींवर निर्णय घेतला नाही, तर आम्ही कोविड वगैरे काही बघणार नाही, असा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दिलाय. 6 जूनपर्यंत मी अल्टिमेटम देत आहे. त्यानंतर रायगडावरून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा निर्धारही संभाजीराजे छत्रपतींनी बोलून दाखवलाय.

तीन पर्याय सत्ताधारी-विरोधकांना मान्य:
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी संभाजी छत्रपती यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसमोर तीन पर्याय दिले आहेत. हे तिन्ही पर्याय त्यांनी मान्य केले आहेत. नंतर त्यांनी हे तीन पर्याय मान्य केले नाही तर त्याला तेच जबाबदार असतील असं ते म्हणाले. मराठा आरक्षण ही राज्य आणि केंद्राची जबाबदारी आहे. तुझं माझं करून चालणार नाही. इथं नवरा बायको म्हणूनच राहावं लागणार आहे. मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर कुटुंबासारखं वागावं लागेल. आता शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून व्हेटो काढावा लागेल. पण तो पूर्वीसारखा व्हेटो नसणार. तर व्हेटो म्हणजे गोड बोलून एकत्र येण्याचं काम करावं लागणार आहे, असं ते म्हणाले.

तीन पर्याय कोणते:
पहिला पर्याय: राज्य सरकारने तात्काळ रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी. हा राज्य सरकारचाच विषय.

दुसरा पर्याय: रिव्ह्यू पिटीशन टिकलं नाही तर क्युरिटिव्ह पिटीशन दाखल करावी. हा शेवटचा पर्याय आहे. पण हा पर्याय अपवादात्मक आहे. त्यासाठी भक्कम पुरावे घेऊनच कोर्टात जावं लागणार आहे.

तिसरा पर्याय: ‘342 अ’ च्या माध्यमातून आपण प्रपोजल केंद्राकडे देऊ शकतो. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देतील. त्यांना योग्य वाटलं तर ते संसदेकडे पाठवतील.

 

News English Summary: Sambhaji Raje Chhatrapati warned that if the government does not take a decision on the five things I have said by June 7, we will not see anything like Kovid. I am giving an ultimatum till June 6. After that, Sambhaji Raje Chhatrapati also expressed his determination to start the agitation from Raigad

News English Title: MP Chhatrapati Sambhajiraje gave ultimatum of 7th June to State govt over options given on Maratha Reservation news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x