22 November 2024 3:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | वजन कमी करायचे आहे? | मग आरोग्यदायी काकडी खा

Cucumber for weight loss

मुंबई, 29 मे | काकडी खूप कमी कॅलरी असणारं पदार्थ आहे. १०० ग्राम काकडीमध्ये ५४ कॅलरी ऊर्जा असते. म्हणूनच काकडी खाल्ल्यानं वजन वाढत नाही. काकडी ब्लड प्रेशरलाही कमी करते, मात्र ब्लड प्रेशरचा त्रास असणारे रुग्ण काकडीला मीठ लावून खाऊ नये. काकडी शरीरातील विषारी पदार्थ यूरिनच्या माध्यमातून शरीराबाहेर काढते.

सोबतच काकडीच्या ज्यूसमध्ये असे काही पोषक तत्त्वे आहेत की ज्यामुळं बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीची समस्या दूर होऊ शकते. पचनक्रिया मजबूत करण्यासोबत काकडी गॅस्ट्रिक आणि छोट्या आतडीचा अल्सर झालेल्या रुग्णांसाठी औषध म्हणून काम करते. काकडीमध्ये ९६ टक्के पाणी असतं, जे की कोणत्याही कंपनीच्या बंद बाटलीच्या पाण्यापेक्षा चांगलं आणि शुद्ध असतं.

काकडी खा आणि फिट राहा:
शारीरिक तंदुरुस्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड खाणे आवश्यक असते, असे डॉक्टर सांगतात. घर असो अथवा हॉटेल सॅलडच्या डिश मध्ये काकाडी नसली तरी चुकल्यासारखं वाटतं. उन्हाळ्यामध्ये तर काकडीची मागणी अधिक वाढते. सॅलडचा भाग म्हणून किंवा ज्युस म्हणून काकडी खाल्ली तरी ती शरीरासाठी उपयुक्त असते. अनेक शरीरिक समस्यांवर काकडी हा रामबाण उपाय आहे.

पोषक तत्वे:
काकडीमध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, फोस्फरस, लोह यांसारखे अनेक पोषक गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. काकडीमधील इरेप्सिन नावच्या एन्झाइममुळे शरीराला प्रोटिन पचवण्यास मदत होते. काकडीमध्ये फाइसाइटीन नावाचा एक घटक असतो. मेंदू तंदुरुस्त राहाण्यासाठी फाइसाइटिनचा वापर होतो. नियमितपणे काकडी खाल्ल्यास विस्मरणाच्या (मेमरी लॉस) समस्या निर्माण होत नाहीत, असे एका संशोधनात आढळून आले आहे.

अनेक आजारांवर उपयोगी:
वाढत्या वयातील लोकांसाठी सांधेदुखी ही एक मोठी समस्या असते. गाजरासोबत काकडीचे सेवन केल्यास सांधेदुखीची तीव्रता कमी होते. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. काकडीचे नियमित सेवन केल्याने कॅन्सरचा धोका काही प्रमाणात कमी होतो. काकडीमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होत. काकडीचा रस किडनीसाठी आरोग्यदायी असतो.

कॅलरीजचे प्रमाण कमी:
काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि पाण्याचे प्रमाण अधिक असते. कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने वजन कमी करण्यासही ते उपयुक्त ठरतात. दररोज रात्री झोपण्यापुर्वी एक ग्लास काकडीचं ज्युस प्यायल्यास शरीरीतील फॅट कमी होतोत.

 

News English Summary: Cucumber is a very low calorie food. 100 grams of cucumber has 54 calories. That is why eating cucumber does not cause weight gain. Cucumber also lowers blood pressure, but patients with high blood pressure should not eat cucumber with salt. Cucumber removes toxins from the body through urine.

News English Title: Cucumber is a very low calorie food help for weight loss health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x