22 April 2025 12:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Health First | दीर्घ श्वसनामुळे 48 तासांत शरीराला होतात हे ५ फायदे

Prolonged breathing benefits

मुंबई, २९ मे | शरीर स्वास्थ्याच्या दृष्टिने श्वसन क्रिया महत्त्वाची भूमिका बजावते. असं असलं तरीही बहुतांश जणांना याविषयी योग्य माहिती नसते. निरोगी राहण्यासाठी हळूहळू आणि दीर्घ श्वास घेणं गरजेचं असतं. श्वसनाद्वारे घेण्यात येणारा ऑक्सिजन हा शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतो. यामुळे रक्ताभिसरणही व्यवस्थित होतं. दीर्घ श्वासोच्छवासाचे शारीरिक आणि मानसिक फायदे अनेक आहेत.

दरराेज काही वेळ दीर्घ श्वसन केल्याने तुमच्या आरोग्यासह जीवनशैलीत खूप सुधारणा होते. तुम्ही चिंतित वा त्रस्त असता तेव्हा तुमच्या हृदयाची धडधड सातत्याने वाढत जाते. रक्तप्रवाह हृदय व मेंदूकडे वाढू लागतो. हे टाळण्यासाठी दीर्घ श्वसन करण्याचा सराव दररोज केला पाहिजे, मग भलेही तणाव असो की नसो. यामुळे २४ ते ४९ तासांतच मन व शरीराला आराम मिळतो आणि झोपही चांगली येते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये आणखी सुधारणा होते.

शरीरातील विषारी घटक घटतात:
सावकाश, सखोल व दीर्घ श्वास घेतल्याने शरीर डिटॉक्सिफाय होण्यासह मन शांत होण्यास मदत होते. झोप चांगली येते. निद्रानाशाचा त्रास असेल तर झोपण्यापूर्वी दीर्घ श्वसन करा. श्वासातून बाहेर येणारा कार्बन डायऑक्साइड नैसर्गिक आहे. छोट्या श्वासांमुळे फुप्फुसे कमी प्रतिक्रिया करतात. इतर अवयवांना हा कचरा बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.

प्रतिकारशक्ती मजबूत होते:
दीर्घ श्वसनाने ताजा आॅक्सिजन मिळतो आणि विषारी पदार्थ व कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. रक्त ऑक्सिजनेटेड झाल्यामुळे शरीराची संरक्षण यंत्रणा मजबूत होते. शरीराचे महत्त्वाचे अवयव नीट काम करतात. क्लीनर, टॉक्सिनमुक्त आणि निरोगी रक्तपुरवठ्याने संसर्ग पसरवणारे जंतू मुळापासून नष्ट होतात.

वेदनांची जाणीव कमी होते:
दीर्घ श्वसनाने शरीरात एंडाॅर्फिन तयार होते. हे गुड हार्मोन आहे आणि शरीराद्वारे तयार केलेले नैसर्गिक वेदनाशामक आहे.

तणाव कमी होतो:
दीर्घ श्वसनाने चिंताजनक विचार आणि घबराटीपासून मुक्तता होते. हृदयाची गती धीमी होते. त्यामुळे शरीर अधिक ऑक्सिजन घेऊ शकते. हार्मोन संतुलित होतात. काॅर्टिसोलची पातळी कमी होते. काॅर्टिसोल हे स्ट्रेस हार्मोन आहे. त्याची पातळी जास्त काळ वाढलेली असल्यास शरीराचे जास्त नुकसान होऊ शकते.

रक्तप्रवाह चांगला होतो:
डायफ्राम वर आणि खाली होत असल्याने रक्तप्रवाहाची गती वाढते. त्यामुळे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.

वरील पाच श्वसनाचे व्यायामप्रकार नियमित करा. अतिशय सोपे आणि पटकन होणारे हे व्यायामप्रकार आहेत. यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आराम मिळेल हे नक्की. वर दिलेले व्यायामप्रकार तीन ते पाच वेळा करा.

 

News English Summary: Respiratory function plays an important role in terms of body health. Even so, owning one is still beyond the reach of the average person. Breathing slowly and deeply is essential for good health. Respiratory oxygen is very beneficial for the body. It also improves blood circulation. The physical and mental benefits of prolonged breathing are many.

News English Title: Prolonged breathing benefits for health news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या