15 November 2024 9:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

VIDEO | ममतांनी मोदींना ऑन कॅमेरा झापलं | म्हणाल्या, आमचा विजय झाला हे तुमच्या चिंतेचं कारण आहे का?

CM Mamta Banerjee

कोलकत्ता, २९ मे | यास’ चक्रीवादळामुळे ओदिशात झालेल्या हानीचा शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला, तेव्हा वरचेवर येणाऱ्या वादळांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर दीर्घकालीन तोडगा काढण्याची व आपत्कालीन यंत्रणेची तरतूद करण्याची मागणी ओदिशा सरकारच्या वतीने करण्यात आली.

यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा अहवाल शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला. राज्यातील सर्वाधिक बाधित परिसरांच्या पुनर्विकासासाठी २० हजार कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य द्यावे, अशी मागणी या वेळी ममतांनी मोदी यांच्याकडे केली. ममता आणि मोदी यांची पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील कलाईकुंडा येथे भेट झाली आणि दोघांमध्ये केवळ १५ मिनिटे चर्चा झाली.

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी यास चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या ओडिशा व पश्चिम बंगालची पाहणी केल्यानंतर आढावा बैठक बोलावली होती. दरम्यान, बैठकीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी न झाल्याने हे प्रकरण आता वाढतच चालले आहे. ही आढावा बैठक पंतप्रधान मोदी यांनी प. मेदिनीपूर जिल्ह्याच्या कलईकुंडात आयोजित केली होती. सूत्रांनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व मुख्य सचिव अल्पन बंदोपाध्याय त्याच परिसरात होते, मात्र 30 मिनिटांपर्यंत बैठकीत आले नाहीत. उशिराने आल्यानंतर ममतांनी वादळाबाबत एक अहवाल पंतप्रधानांकडे सोपवला. ममता व त्यांचे अधिकारी दुसरी महत्त्वाची मीटिंग असल्याचे सांगत बाहेर पडले.

संबंधित प्रकरणावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. दरम्यान, एटीएसने मला पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर उतरत असल्यामुळे २० मिनिटे उशीरा सागर बेटातून कलाईकुंडावर जाण्यास सांगितले होते. त्यानंतर कलाईकुंडावरदेखील मला 15 मिनिटानंतर उतरण्याची परवानगी देण्यात आली. तोपर्यंत पंतप्रधान तेथे पोहोचले होते. मी तिथे गेलो आणि त्यांना भेटण्याची परवानगी मागितली पण बरीच प्रतीक्षा केल्यानंतर मला त्यांना भेटायला परवानगी मिळाली.

दरम्यान, ऑनलाईन झालेल्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना अक्षरशः फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं. यावेळी केंद्र सरकारच्या दुजाभाव करण्यावरून संतापलेल्या ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “तुम्ही असे का वागता? पश्चिम बंगालच्या लोकांनी तुम्हाला हद्दपार केलं आणि आम्हाला मोठा विजय मिळवून दिला हे तुमच्या चिंतेचं कारण आहे का? असा रोखठोक सवाल थेट ऑन कॅमेरा केल्याने केंद्राची बोलती बंद झाल्याचं पाहायला मिळालं.

 

News English Summary: To Modi ‘Why are you behaving like this? Bengal people ousted you and gave us landslide victory is that your worry?’ To the point said CM Mamta Banerjee news updates.

News English Title: CM Mamta Banerjee fired PM Narendra Modi on camera over cyclone meeting news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x