14 November 2024 10:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल तगडा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
x

रोज केवळ १ रुपयाची बचत करा | बनवू शकता 15 लाखांचा मोठा फंड | काय आहे योजना

Sukanya Samriddhi Scheme

नवी दिल्ली, २९ मे |  केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आंदोलनांअतर्गत सुकन्या समृद्धी योजनेची सुरूवात केली होती. त्या अंतर्गत मुलीच्या शिक्षणाची सोय व तिच्या लग्नासाठी तरतूद करण्यासाठी, पालकांना उपयुक्त योजना सुरू केली. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यास मुलीचं शिक्षण आणि लग्नावेळी मुबलक पैसा उपलबद्ध होईल. सुकन्या समृद्धी योजनेत १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतो. त्यानंतर ६४ लाख रुपये मुलीच्या खात्यावर जमा होतात. यात सरकारकडून काही रक्क देऊ केली जाते.

सुकन्या समृद्धी योजनेतील मुलीच्या अठराव्या वर्षी ५०% रक्कम तिच्या शिक्षणासाठी काढता येते व बाकी रक्कम २१ वर्षांनंतर किंवा लग्नाच्या वेळेस (१८ ते २१ वर्षांदरम्यान) काढता येते. मुलीच्या दहाव्या वर्षांपर्यंत खाते उघडता येते फक्त दोन मुलीसाठीच खाते उघडता येते. एका मुलीसाठी कोठेही फक्त एकच खाते उघडता येते. दुसऱ्या जुळ्या मुलींसाठी किंवा तिळ्यांसाठी नियमांत शिथिलता आहे. मुलगी दहा वर्षांची होईपर्यंत खाते उघडता येते. दरवर्षी व्याजाचा दर इतर व्याजदरांप्रमाणे जाहीर केला जाईल. व्याज चक्रवाढ पद्धतीने दिले जाते. पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकाच्या कोणत्याही शाखेत हे खाते उघडता येते.

आज आम्ही तुम्हाला याच सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही अगदी थोड्या पैशात गुंतवणूक करून भरमसाठ रक्कम जोडू शकता. या सरकारी योजनेचे सुकन्या समृद्धी योजना (SSY) असे नाव आहे.

या योजनेत दररोज एक रुपया इतकी किरकोळ बचत करून तुम्ही मोठी रक्कम साठवू शकता. प्राप्ती कर बचतीचाही लाभही या योजनेला मिळतो. दररोज एक रुपया जरी तुम्ही वाचवला तरी या योजनेत गुंतवणूक करणे शक्य आहे. महिन्याला तीन हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला मुदतीनंतर 15 लाख रुपये मिळू शकतात.

काय आहे सुकन्या समृद्धी योजना?
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाअंतर्गत सरकारने ही अल्पबचत योजना (Small Saving Scheme) दाखल केली आहे. सर्वाधिक व्याजदर असणारी ही योजना आहे.

किमान गुंतवणूक:
अवघ्या 250 रुपयांनी खाते उघडून या योजनेत गुंतवणूक करता येते. म्हणजेच तुम्ही दररोज एक रुपया जरी साठवला तरी महिन्याला 250 ते 300 रुपये यात भरू शकता. दर वर्षी किमान 250 रुपये भरणे आवश्यक आहे. तर कमाल दीड लाख रुपये यात भरता येतात.

किती व्याज मिळते?
सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.6 टक्के असून यावर प्राप्ती करातून सवलतीचा लाभही मिळतो. अगदी सुरुवातीला या योजनेचा व्याज दर तब्बल 9.2 टक्के इतका होता. या योजनेत गुंतवणूक सुरू केल्यानंतर आठ वर्षांनी मुलीच्या उच्च शिक्षणासाठी यातून 50 टक्के रक्कम काढता येते.

मुदतीनंतर मिळतील 15 लाखांपेक्षा जास्त रक्कम:
या योजनेत दरमहा तीन हजार रुपये गुंतवले तर वर्षाला 36 हजार रुपये गुंतवणूक होईल. 14 वर्षांनी 7.6 टक्के दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने 9 लाख 11 हजार 574 रुपये मिळतील. तर 21 वर्षांच्या मॅच्युरिटीवर तब्बल 15 लाख 22 हजार 221 रुपये मिळतील. यात 7.6 टक्के दराने मिळणारे व्याज करमुक्त आहे.

खाते कसे उघडता येईल?
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते पोस्टाच्या कोणत्याही शाखेत उघडता येईल. दहा वर्षे वयापर्यंतच्या मुलीच्या नावे हे खाते उघडता येते. किमान 250 ते कमाल दीड लाख रुपये एका वर्षात भरता येतात.

कधीपर्यंत खाते सुरू ठेवावं लागते?
सुकन्या समृद्धी योजनेतील खाते तुमची मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न होईपर्यंत तुम्हाला हे खाते सुरू ठेवता येते.

आवश्यक तेवढे पैसे जमा न करता आल्यास?
या योजनेत दरवर्षी किमान 250 रुपये भरावे लागतात. ते भरले नाहीत तर खाते बंद होते. खाते पुन्हा सुरू करण्यासाठी दरवर्षी 50 रुपये दंड भरून खाते पुन्हा सुरू करता येते. 15 वर्षांपर्यंत खाते बंद पडल्यास पुन्हा सुरू करण्याची सुविधा मिळते.

 

News English Summary: In the 18th year of Sukanya Samrudhi Yojana, 50% of the amount can be withdrawn for her education and the remaining amount can be withdrawn after 21 years or at the time of marriage (between 18 to 21 years). An account can be opened up to the tenth year of a girl child only for two girls. Only one account can be opened anywhere for a girl.

News English Title: Sukanya Samriddhi Scheme open Sukanya Samriddhi Account And Make 15 Lakhs Rupees news updates.

हॅशटॅग्स

#Money(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x