Special Recipe | झणझणीत खान्देशची वांग्याचे भरीत | करून पहा
मुंबई, ३१ मे | खान्देश म्हटलं की डोळ्यासमोर येत ते वांग्याचं भरीत ! गरेदार वांगे,शेंगदाण्याचा स्वाद त्याला कांद्याच्या पातीची साथ आणि त्याला कांदा लसणाची फोडणी असलेले हे भरीत किती खाऊ आणि किती नको असे होते. गरमागरम भाकरी, वांग्याचे भरीत, मिरचीचा ठेचा आणि बुक्कीने फोडलेला कांदा असा बेत म्हणजे आयुष्य सार्थकी लागल्याची भावनाचं. तेव्हा जिभेला तृप्त करणारे हे भरीत नक्की करून बघा.
साहित्य :
- जळगावी वांगी किंवा भरताची जांभळी वांगी वापरावी
- लसूण पात किंवा लसणाच्या दहा ते बारा मोठ्या पाकळ्या
- कांद्याची पात
- मध्यम चौकोनी चिरलेला कांदा
- मिरच्या आठ ते दहा
- शेंगदाणे पाव वाटी
- तेल
- मोहरी
- मीठ
- कोथिंबीर
कृती :
- वांग्यांना तेल लावून गॅसवर भाजून घ्या.
- वांगं व्यवस्थित सर्व बाजूंनी काळ्या रंगाचे भाजल्यावर ते ताटात घेऊन त्यावर १५ मिनिटे कढई किंवा पातेले झाकून ठेवावे. यामुळे साल सहज निघते.
- वांगं गार झाल्यावर त्याची साल काढून आणि देठ काढावा.
- वांग्याचा गर एक पातेल्यात घेऊन त्यात थोडेसे मीठ घालून एकजीव करावा.
- हीच कृती खलबत्त्यात किंवा लाकडी बडगी घालून केल्यास भरीत अधिक चवदार होते.
- दुसरीकडे कढईत थोड्याशा तेलात सात ते आठ मिरच्या परतवून घ्याव्यात. मिरच्या हलक्या परताव्यात, रंग बदलू नये.
- या मिरच्या काढून त्यात लसूण हलका परतावा.
- याच तेलात शेंगदाणे घालून तळून घ्यावेत.
- एका मिक्सरच्या भांड्यात मिरच्या, लसूण एक ते दोनवेळा फिरवून घ्यावे. अगदी बारीक करू नये.
- आता कढईत पुन्हा तेल कडकडीत तापवून मोहरी टाकावी.
- मोहरी तडतडल्यावर मिरची, लसणाचे वाटण घालावे.
- त्यात चिरलेला कांदा घालावा.
- कांदा अर्धवट परतावा, गुलाबी करू नये.
- यात बारीक चिरलेली कांद्याची व लसणाची पात घालावी आणि लगेचच वांगे घालावे.
- यात आता शेंगदाणे घालून भरीत एकसारखे करावे.
- या भरतात चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
- हे भरीत कुठलीही भाकरी किंवा पोळीसोबत भन्नाट लागते.
News English Summary: Khandesh said that the eggplant was coming in front of his eyes! The grated wange, the peanut flavor, the accompanying onion leaves and the onion garlic cloves were all about how much to eat and how much not to eat. Hot bread, eggplant stuffing, chilli paste and onion fried with buckwheat are all meant to make life meaningful.
News English Title: Tasty brinjal vegetable known Vangyache Bharit special recipe news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार