24 November 2024 7:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Health First | आहार शास्त्राच्या दृष्टीने सूर्यास्तापूर्वी जेवणे का उचित ठरते? - सविस्तर वाचा

Eat before sunset

मुंबई, ०१ जुन | आयुर्वेदानुसार सूर्यास्तापूर्वी आहार घेणे आवश्यक आहे. जैन धर्मात तर या नियमाचे आवर्जून पालन केले जातं. तसेच हिंदू आणि जैन धर्मात आहाराचे काही नियम आहे जसे जेवण्यापूर्वी पाणी पिणे उत्तम, मध्ये पिणे मध्यम आणि नंतर पाणी पिणे निम्नतम मानले आहे. जेवण्याच्या अर्धा तास आधी आणि जेवणाच्या 45 मिनिटांनंतर पाणी प्यायला हवे. मध्ये हवं असल्यास केवळ एकदा पाणी पिऊ शकता. तसेच सकाळ पासून संध्याकाळपर्यत विभिन्न नियम आणि सिद्धांत तयार केलेले आहे. यामागे वैज्ञानिक कारणदेखील आहे.

अलीकडच्या डाएट बाबतीत एवढा संभ्रम निर्माण झाला आहे, की कोणाचे ऐकावे आणि कोणाचे नाही अशी परिस्थिती आली आहे. तरीदेखील एका बाबतीत सर्व आहार तज्ज्ञांचे एकमत होते, ते म्हणजे सूर्यास्ताआधी जेवणे. या गोष्टीला धर्म शास्त्राने देखील दुजोरा दिला आहे. एवढेच नाही, तर पूर्वीच्या काळी या गोष्टीचे कटाक्षाने पालन केले जात असे. एवढेच काय, तर निसर्गात डोकावले तर पशु पक्षी देखील सूर्यास्तानंतर खात पित नाही. याचा अर्थ हा नियम निसर्गाला अनुसरून आहे का? यामागे नेमके कारण काय आहे, ते जाणून घेऊया.

पहिले कारण:
सूर्यास्ताआधी जेवल्याने पचनक्रिया नियंत्रित राहते. सेवन केलेले अन्न दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत व्यवस्थित पचते.

दुसरे कारण:
सूर्यास्ताआधी जेवल्याने अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव होतो. रात्रीचे जेवण उशिरा घेतल्यामुळे ते पचत नाही आणि विविध रोग शरीरात घर करतात.

तिसरे कारण:
सूर्यास्तानंतर सूर्य प्रकाशा अभावी वातावरणात सूक्ष्म जिवाणूंचे साम्राज्य वाढते. ते जिवाणू अन्नात शिरकाव करतात आणि त्यामुळे अनेक व्याधी जडतात.

चौथे कारण:
सूर्यास्तानंतर प्रकृतीत अनेक बदल घडतात. पशु पक्षी देखील सूर्यास्ताआधी जेवून झोपी जातात. आपल्या शरीरावर निसर्गाचा प्रभाव पडत असतो. आपण प्रकृतीशी जेवढे जुळवून घेऊ, तेवढे निरोगी राहू. म्हणून ही दिनचर्या आत्मसात करणे सोयीस्कर ठरते.

 

News English Summary: According to Ayurveda, it is necessary to eat before sunset. In Jainism, this rule is strictly followed. Also in Hinduism and Jainism there are certain rules of diet such as drinking water before meals, drinking in moderation and then drinking water is considered minimum. Drink water half an hour before meal and 45 minutes after meal. You can drink water only once if you want. Also various rules and principles have been formulated from morning to evening.

News English Title: It advisable to eat before sunset in terms of diet and theology health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x