22 November 2024 1:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | ग्रीन टी पेक्षा फायदेशीर आहे ब्लू टी | ६ फायदे जाणून घ्या

Blue tea Benefits

मुंबई, ०१ जुन | ब्लू टी पूर्णपणे हर्बल टी असते. हे शंख पुष्पचं निळं फूल असतं. याला इंग्रजीमध्ये Asian pigeonwings असं म्हणतात. या फुलाची चहा बनवली जाते. याला बटरफ्लाय टी या नावानं देखील ओळखली जाते. निळं शंख पुष्पचं फूल उकळून बनवण्यात आलेल्या चहामध्ये एक नाही तर अनेक फायदे लपलेले आहेत. ब्लू टी दक्षिण- पूर्व आशियामध्ये सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे. ही चहा स्वादिष्ट असते त्यासोबतच या चहाला छान सुंगध येतो. ही चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

ब्लू टीमध्ये अॅन्टिऑक्सिडेंटचा पावर हाऊस असतं. ब्लू टीमध्ये इतके जास्त अॅन्टिऑक्सिडेंट असतात जितके ग्रीन टी किंवा ब्लॅक टीमध्ये नसतील. या टीमध्ये असलेलं बायो-कंपाऊंट शरीरातील फ्रि रॅडिकल लढण्यासाठी मदत करतात. यामुळे इम्यून सिस्टम देखील मजबूत होतं.

आपल्याला ग्रीन टी आणि ब्लॅक टी बद्दल माहित आहे आणि आपण त्याचे सेवन देखील केले असेल, परंतु आपण कधीही निळा चहा म्हणजे ब्लू टी प्यायला आहे का? जर आपण प्यायला नाही तर एकदा नक्की प्रयत्न करा कारण हा निळा चहा आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी खूप फायदेशीर आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की चहा निळा कसा? तर आम्ही सांगू इच्छितो की हा चहा अपराजिताच्या सुंदर निळ्या फुलांना उकळवून बनवतात.म्हणून हा निळा रंगाचा असतो. याला बटरफ्लाय टी देखील म्हणतात. याला बनविण्याची कृती आणि 5 आश्चर्यकारक फायदे देखील आहे. चला जाणून घ्या.

कृती:

हा चहा बनवण्यासाठी तुम्हाला अपराजिताची निळे फुले, पाणी आणि मीठ, साखर किंवा लिंबू चवीप्रमाणे लागतील. प्रथम पाणी उकळवा आणि त्यात अपराजिताची फुले घाला. त्याचा रंग निळा झाल्यावर मीठ किंवा साखर घालून काही थेंब लिंबाचा रस घाला आणि गाळण्याने गाळून घ्या. आता हा चहा पिण्यास तयार आहे.

आता त्याचे फायदे जाणून घ्या:

डिटॉक्स टी:
आपल्या शरीरातून अवांछित घटक काढून टाकून हा चहा शरीराला डिटॉक्स करतो आणि शरीराची अंतर्गत स्वच्छ करतो.

रोग प्रतिकारशक्ती बूस्टर:
रोग प्रतिकारशक्ती बूस्टर म्हणून कार्य करतो आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवून रोगांपासून आपले संरक्षण करतो.

मधुमेह:
मधुमेहाच्या रूग्णांसाठी हा निळा चहा खूप फायदेशीर आहे. साखरेची पातळी राखण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.

सौंदर्य लाभ:
आपण सौंदर्याला वाढवू इच्छित असल्यास, निळा चहा एक चांगला पर्याय आहे. हा चेहऱ्यावरील डाग,आणि फ्रेकल्स नाहीसे करून रंग सुधारण्यास मदत करतो.

मायग्रेन:
सकाळी या चहाचे सेवन केल्याने मायग्रेनच्या रुग्णांना फायदा होतो. वेदना व्यतिरिक्त मानसिक थकवा देखील दूर करतो.

डोळ्यांसाठी गरजेचं:
डोळ्यांना होणारा कोणत्याही प्रकारच्या त्रासावर ब्लू टी खूप काम करतं. यात उपस्थित अॅन्टिऑक्सिडेंट डोळ्यातील पेशीत ब्लड सर्कुलेशन वाढवते. यामुळे डोळे चांगले राहतात. मोतीबिंदू, कमकुवत दृष्टी, रेटिनलशी संबंधित समस्येत ही चहा पिणं खूप फायदेशीर होतं.

ब्लू टी जर तुम्ही रोज प्यायल्यास यामुळे लिव्हर, किडनी, पोट आणि आतड्यांची सफाई होते. ही चहा तुमचं शरीर डिटॉक्स करते. ही अॅन्टिऑक्सिडेंट, अॅन्टी-इंफ्लेमेटरी आणि नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवते. यूटीआय किंवा यूरिनशी संबंधित काही त्रासांमध्ये ही चहा फायदेशीर आहे.

 

News English Summary: Blue tea is a completely herbal tea. This conch is a blue flower. This is called Asian pigeonwings in English. This flower is used to make tea. It is also known as butterfly tea. There are many benefits to boiling blue conch flower tea. Blue tea is one of the most famous in South-East Asia. This tea is delicious and has a nice aroma. This tea is very beneficial for health.

News English Title: Blue tea is more beneficial than green tea health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x