मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात संभाजीराजे आणि भाजपमध्ये तीव्र मतभेद?
मुंबई, ३१ मे | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेऊन राज्यभर दौरा करत असलेले कोल्हापूर राजघराण्याचे वारसदार संभाजीराजे भोसले नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच कोल्हापुरातील राजकीय समीकरणे पाहता ते आगामी लोकसभा लढवतील, तीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मराठा आरक्षणाच्या मुद््द्यावर संभाजीराजे सध्या महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. त्यांनी शरद पवार ते राज ठाकरे अशा सर्व राजकीय पक्षप्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या.
शनिवारी पुण्यात त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्या वेळी बहुजन समाजाचे नेतृत्व संभाजीराजेंनी करावे, असे अॅड. आंबेडकर म्हणाले. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात आता नवी समीकरणे आकारास येत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दुसरीकडे कोल्हापूरचेच असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संभाजीराजे यांचे बिलकुल सख्य जुळले नाही. संभाजीराजे यांनी अद्याप भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारलेले नाही, हे उल्लेखनीय. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्द्यावर संघर्ष न करता महाविकास आघाडी सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेण्याची संभाजीराजेंची भूमिका भाजपला अमान्य असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याने संभाजीराजे भारतीय जनता पक्षापासून दूर जात असल्याचेही संकेत मिळत आहेत.
संभाजीराजे शांत व संयमी आहेत. मात्र त्यांना राजकीय अनुभव नाही, पक्ष स्थापून तो चालवण्याचा त्यांचा आवाका नाही. ‘बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्ष स्थापन करेन,’ असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. तरी ते स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करतील, अशी शक्यता नसल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. तसेच संभाजीराजे यांची तशी कोणतीही तयारी नाही, असेही सांगण्यात आले.
संभाजीराजे यांना भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यास त्यांना घरातून विरोध आहे. भारतीय जनता पक्षात जाण्याने घराण्याच्या वैचारिक वारशांशी फारकत घेणे होय, असे त्यांचे कुटुंबीय मानतात. विदर्भ, मराठवाड्यात त्यांना मानणारा तरुण वर्ग मोठा आहे. हाच वर्ग संभाजी ब्रिगेडच्या मागे होता. त्याच्या जोरावर ब्रिगेडने राजकीय पक्ष स्थापला, तरी पाठिराख्यांचे मतांत परिवर्तन झाले नव्हते. त्यामुळेच संभाजीराजे भारतीय जनता पक्षापासून जरी दूर जात असले तरी ते स्वतंत्र पक्ष स्थापन करतील, अशी सुतराम शक्यता नाही, असे सांगितले जाते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते वर्ष २०२४ची लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असाही दावा निकटवर्तियांनी केला.
News English Summary: Sambhaji Raje did not get along well with Chandrakant Patil, the state president of the Bharatiya Janata Party from Kolhapur. It is noteworthy that Sambhaji Raje has not yet accepted the membership of the Bharatiya Janata Party.
News English Title: Maratha reservation Sambhajiraje and BJP political war equations in the state news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY