कोरोनाचा उगम शोधा | अन्यथा कोविड-26 आणि कोविड-32 साठी तयारी करा - शास्त्रज्ञांचा इशारा
नवी दिल्ली, ३१ मे | कोरोना व्हायरस कधी आला, कुठून आला आणि कसा आला, या प्रश्नांची उत्तरे शास्त्रज्ज्ञ घेत आहेत. आतापर्यंत दोन प्रकारच्या थेअरींवर सर्वाधिक बोलले जात आहे. पहिल्या थेअरीमध्ये कुठल्यातरी प्राण्यापासून कोरोना माणसांपर्यंत आल्याचे म्हटले जात आहे, तर दुसऱ्या थेअरीमध्ये चीनच्या एखाद्या लॅबमध्ये कोरोना तयार केल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांनी एका रिपोर्टनंतर आपल्या संस्थांना 90 दिवसांत या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, मागच्या आठवड्यात आय वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, नोव्हेंबर 2019 मध्ये वुहानच्या लॅबमधील तीन शास्त्रज्ज्ञांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती. तेव्हा चीनने जगाला कोरोना महामारीबद्दल सांगितले नाही.
दुसरीकडे, जगभरात याची चर्चा सुरु असून चिंता देखील वाढली आहे. अमेरिकेची मीडिया कंपनी ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीवरून अमेरिकेच्या दोन वैज्ञानिकांनी मोठा इशारा दिला आहे. कोविड-19 च्या उगमाचा शोध घ्या नाहीतर कोविड-26 आणि कोविड-32 साठी तयार रहा, असे म्हटले आहे.
अमेरिकेच्या तत्कालीन डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनचे कमिशनर राहिलेले स्कॉट गॉटलीब आणि टेक्सासच्या चिल्ड्रन्स हॉस्पिटल सेंटर फॉर व्हॅक्सिन डेव्हलपमेंटचे सहाय्यक संचालक पीटर होट्स यांनी हा इशारा दिला आहे. महत्वाचे म्हणजे गॉटलीब हे सध्या कोरोना लस आणलेल्या फायझरच्या संचालक मंडळावर आहेत.
कोविड 19 च्या उगमाचा शोध घेण्यासाठी आणि भविष्य़ातील महामारींचा धोका रोखण्यासाठी चीनच्या सरकारने जगाची मदत करायला हवी. गॉटलीब यांच्या म्हणण्यानुसार चीनच्या लॅबमधूनच कोरोनाचा जन्म आणि प्रसार झाल्याचा जगाच्या दाव्यांना आणखी काही ठोस पुरावे सापडले आहेत. याचसोबत चीनने हे पुरावे खोटे ठरविण्यासाठी काहीच माहिती दिलेली नाहीय. तर होट्सनी म्हटले की, ज्या पद्धतीने कोरोना पसरला आहे त्यानुसार भविष्यात देखील महामाऱ्या पसरण्याचा धोका वाढला आहे.
News English Summary: Co-director of the Texas Children’s Hospital Center for Vaccine Development, Peter Hotez said in a TV appearance on Sunday that not knowing how the pandemic began and confusion about its actual origin puts the world at risk of future outbreaks. “There’s going to be COVID-26 and COVID-32 unless we fully understand the origins of COVID-19,” Hotez said in a live-streamed address on NBC’s “Meet the press.
News English Title: Find Covid 19 Origin Or Face Covid 26 And Covid 32 pandemic alert by US Experts news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News