19 April 2025 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

यूट्यूबवरुन कमाई करता? | अमेरिकन कायद्यामुळे भारतीय कंटेंट क्रिएटर्सवर 24% करांचा दणका लागणार?

Youtube earnings

वॉशिंग्टन, ०१ जून | यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन कमाई करणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. गूगल यूट्यूब कमाईवर या महिन्यापासून 24% कर लावणार आहे. ही नवीन पॉलिसी अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशातील कंटेंट क्रिएटर्सवर आजपासून लागू होईल. परंतु, जानकारांचे म्हणने आहे की, भारताचे व्हिडिओ अमेरिकेत जास्त पाहिले जात नसल्यामुळे भारतीय क्रिएटर्सवर नवीन नियमचा जास्त परिणाम होणार नाही. काय आहे यूट्यूबची नवीन टॅक्स पॉलिसी? कधी झाली याची घोषणा? भारतीय यूट्यूबर्सच्या कमाईवर याचा किती परिणाम पडेल ? नवीन पॉलिसीमुळे नुकसान कमी व्हावे, यासाठी काय करावे ?

अमेरिकेच्या टॅक्स कायद्यांतर्गत जगातील यूट्यूबर्स:
अमेरिकेचा कर कायदा ‘इंटरनल रेव्हेन्यू कोड’ च्या चॅप्टर तीन अंतर्गत, यूट्यूबवर अमेरिकेच्या दर्शकांकडून कमाई करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सकडून टॅक्सची माहिती घेण्याची जबाबदारी गूगलची आहे. त्यांच्या कमाईतून टॅक्स कापावा आणि याची माहिती इंटरनल रेव्हेन्यू सर्विसला द्यावी. म्हणजेच, एखादा क्रिएटर अमेरिकेच्या बाहेर राहून अमेरिकेच्या दर्शकांकडून कमाई करत असेल, तर 1 जून 2021 पासून त्याला टॅक्स भरावा लागेल. गूगलने या नवीन पॉलिसीची घोषणा यावर्षी मार्चमध्ये केली होती. यानुसार, यूट्यूब पार्टनरशिप प्रोग्राममध्ये सामील सर्व कंटेंट क्रिएटर्सना 31 मेपर्यंत टॅक्सची माहिती देणे गरजेचे होते.

नवीन पॉलिसीमुळे कमाईवर काय परिणाम होईल?
इन्फ्लूएंसर मार्केटिंग प्लॅटफॉर्म, डू योर थिंगचे फाउंडर अंकित अग्रवाल सांगतात की, बहुतेक इंडियन यूट्यूबर्स स्थानिक भाषेत कंटेंट बनवतात. म्हणून हे व्हिडिओ पाहणारे अनेक लोक भारतीय आहेत. यूट्यूब फक्त त्या कमाईवर टॅक्स लावत आहे, जी अमेरिकेच्या दर्शकांकडून झाली आहे. त्यामुळे या पॉलिसीचा भारतीय क्रिएटर्सवर जास्त परिणाम होणार नाही. तसेच, गूगलला टॅक्सची माहिती दिल्यानंतर फक्त अमेरिकन दर्शकांकडून झालेली कमाईवरच टॅक्स लावला जाईल, भारतीय दर्शकांकडून झालेल्या कमाईवर याचा काहीच परिणाम होणार नाही.

जर यूट्यूबरने 31 मेपर्यंत टॅक्सची माहिती दिली नाही ?
कंपनीच्या नवीन पॉलिसीनुसार, जर यूट्यूबरने आपल्या टॅक्सची माहिती 31 मेपर्यंत दिली नाही. तर, कंपनी त्याच्या एकूण कंमाईवर 24% टॅक्स लावेल. म्हणजेच, जर तुमची एकूण कमाई 1000 रुपये असेल, तर 240 रुपये टॅक्स द्यावा लागेल. पण, टॅक्सची माहिती दिली असेल, तर फक्त अमेरीकन दर्शकांकडून झालेल्या कमाईवर टॅक्स लागेल.

या स्थितीत यूट्यबरच्या 1000 रुपयांच्या कमाईवर फक्त 15 रुपये टॅक्स जाईल. कंपनीने सांगितल्यानुसार, भारत आणि अमेरिकेत टॅक्स करार झाला आहे. यानुसार, दोन्ही देशांच्या दर्शकांकडून झालेल्या एकूण कमाईवर 15% टॅक्स लागेल. क्रिएटर्सची अमेरिकन दर्शकांकडून कमाई झाली असेल किंवा नसेल, आपल्या टॅक्सची माहिती Google ला द्यावी लागेल. येणाऱ्या काळात अमेरिकन दर्शकांकडून कमाई झाल्यावर टॅक्स कापला जाईल, अथवा कापला जाणार नाही.

कंटेंट क्रिएटर्सच्या कमाईचा मोठा भाग गूगल आपल्याकडे ठेवतो. तुमच्या चॅनेलला मॉनिटाइज करायचे असेल, तर गूगलच्या काही अटी मान्य कराव्या लागतात. यातील एक अट म्हणजे, तुमच्या चॅनेलवर आलेल्या जाहिरातींच्या पैशातील 45% गूगल स्वतःकडे ठेवतो. यूट्यूबच्या जाहिरातीमधून गूगलला वर्षाला 1 लाख कोटी रुपयांची कमाई होते.

 

News English Summary: There is bad news for those who make money by uploading videos on YouTube. Google will impose a 24% tax on YouTube revenue from this month. The new policy will apply to content creators in countries other than the United States starting today. However, experts say that the new rules will not have much impact on Indian creators as Indian videos are not seen much in the US.

News English Title: Youtube earnings will be taxed up to 24 percent under Nwe US law will impact on Indian content creators news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#YouTube(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या