मुंबई : मुंबईतील गोरेगावमध्ये पणशीकर नाट्यगृहाच्या भूमिपूजना दरम्यान शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचे वृत्त आहे. आज शिवसेना नेते आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गोरेगावमधील प्रभाकर पणशीकर नाट्यगृहाचे आणि टोपीवाला मंडई तसेच निवासी संकुलासह संयुक्त प्रकल्पाचे भूमिपूजन होणार होते.
दरम्यान कार्यक्रम नियोजित वेळेनुसार होणार असताना कार्यक्रमावेळी भाजपचे कार्यकर्ते सुद्धा पक्षाचे झेंडे घेऊन आले आणि कामाचे श्रेय आमचे असल्याचा दावा करू लागले. दरम्यान दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी सुरु झाली होती. त्यावेळी दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते एक एकमेकांना भिडल्याचे वृत्त आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला असला तरी नियोजित ठिकाणी तणावाचे वातावरण होत.
एकूणच पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली असून सध्या वातावरण निवळायला सुरुवात झाली आहे. परंतु सत्ताधाऱ्यांमध्येच संघर्ष सुरु झाल्याने स्थानिकांना विनाकारण त्रास झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती.






























