21 November 2024 10:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून या योजनेतून मिळवा अनुदान

new wells and old wells apply online

मुंबई, ०२ जून | शेतकरी मित्रांसाठी, केंद्र व राज्य सरकार नेहमीच काहीना काही योजना राबवित असते, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमध्ये वाढ व्हावी, शेतीचा महत्त्वाचा आधार म्हणजे ‘पाणीसाठा’ होय. त्याकरता सरकारने नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्त करणे या करता तसेच शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, ठिबक सिंचन अशा घटकांसाठी शासनाकडून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवणे झाली आहे.

या योजनेअंतर्गत नवीन विहीर तयार करण्याकरिता अडीच लाख रुपये पर्यंत अनुदान प्राप्त होते, तसेच जुन्या विहिरीचे नूतनीकरण करणे किंवा दुरुस्ती करण्याकरिता 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तसेच, इन वेल बोरिंग 20हजार, पंप संच 20हजार, वीज जोडणी आकार 10 हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण 1लाख व सूक्ष्म सिंचन संच, ठिबक सिंचन, संच 50 हजार किंवा तुषार सिंचन संच 25 हजार पीव्हीसी पाईप 30 हजार, परसबाग 500 रुपये या योजनेअंतर्गत दिले जाते.

पात्र असणारे जिल्हे:
ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते परंतु मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज :

  1. योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे दिलेल्या www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटला भेट द्या .
  2. उजव्या कोपऱ्यात भाषेचा पर्याय उपलब्ध असेल तिथे पर्यायावर क्लीक करा तो तुम्हाला हवी असणारी भाषा निवडा.
  3. शेतकरी योजना हा पर्याय निवडा. मग पर्याय निवडल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ यावर क्लिक करा.
  4. या योजनेबाबत अनुदान पात्रता या सर्वांची माहिती दिसेल.
  5. उजव्या कोपऱ्यात नवीन ‘अर्जदार नोंदणी’ (Applicant Registration) या पर्यायावर क्लिक करा, त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
  6. त्यानंतर अर्ज करण्याकरिता अर्जदार लॉगिन पर्यायावर क्लिक करा. लॉगिन प्रकार निवडून वापर ‘कर्ता आयडी’ किंवा ‘आधार क्रमांक’ (Aadhaar Number) टाका.
  7. त्यानंतर ‘प्रोफाईल स्थिती’ (Profile Status) हे वेब पेज ओपन होईल. तिथे ‘अर्ज करा’ हा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर क्लिक करा.
  8. त्यानंतर नवीन वेब पेज ओपन होइल त्यामध्ये शेवटचा पर्याय अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना (Special scheme for farmers) या पर्यायावर क्लिक करा.
  9. त्यापुढे उजव्या कोपऱ्यात बाबी निवडा असा पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
  10. घटक निवडा या पर्यायावर तुम्हाला हवा तो ऑप्शन निवडा किंवा तुम्हाला कोणत्या कामाकरिता अनुदान हवे आहे, तो पर्याय निवडा उदाहरण: जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरींग, ठिबक सिंचन संच, पंप संच, वीज जोडणी आकार, शेततळ्यास अस्तरीकरण, (Lining the farm) नवीन विहीर इ. एक वेळेला एकच पर्याय निवडू शकता.
  11. त्यानंतर जतन करा पर्यायवर क्लीक करा. Ok बटन वर क्लीक करा.
  12. यानंतर तुम्हाला सोडत पद्धतीने म्हणजे लॉटरी (Lottery) पद्धतीने तुमचे नाव जाहीर होईल नाव जाहीर झाल्यास कागदपत्रे जमा करा. अर्ज करण्याकरिता कागदपत्रांची आवश्यकता नसते.

 

News English Summary: An important basis of agriculture is ‘water storage’. For this, the government has to implement Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana in order to repair new wells and old wells as well as to get financial benefits from the government for plastic lining of farms, drip irrigation.

News English Title: Get grants from Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana for repair of new wells and old wells apply online news updates.

हॅशटॅग्स

#Agriculture(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x