उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ | सत्ता जाण्याच्या भीतीने सरसंघचालक आत्तापासूनच स्वतः राजकीय बैठकांच्या मैदानात
लखनऊ, ०३ जून | कोरोना आपत्तीत योगी सरकारवर जनतेचा संताप वाढला असून हिंदुत्वाच्या राजकारणालाही फटका बसला आहे. तसेच मोदींसहित सर्वांनाच याचा फटका बसणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे योगीच्या भरोसे निवडणूक लढविण्यात काहीच अर्थ नाही हे आरएसएसला देखील समजल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश हातून गेला तर देश देखील जाणार हे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना देखील माहिती आहे. परिणामी संघ तसेच मोदी-शहा तिसरी लाट सोडून भाजप विरोधी लाट थोपविण्याच्या कामाला लागले आहेत.
त्यामुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय स्थितीचा आढावा घेणारी चर्चेची दुसरी फेरी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे समजते. सरसंघचालक गुरुवारी दिल्लीत येणार असून संघाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आठ महिन्यांनंतर विधानसभेची निवडणूक होणार असून, यासंदर्भात गेल्या आठवड्यात संघ व भाजपच्या नेत्यांमध्ये चिंतन बैठक झाली होती.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर राज्यातील मंत्री आणि प्रदेश नेते नाराज असून लखनौमध्ये दोन दिवस राष्ट्रीय पक्षसंघटक बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत बैठक झाली. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या हाताळणीवरून योगी प्रशासन पक्षांतर्गत टीकेचे धनी झाले आहे. या पार्श्वभूमीवर संघाच्या नेत्यांमध्ये मंथन होणार असून सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्यासह सर्व सहकार्यवाहही उपस्थित राहणार आहेत. भागवत काही दिवस दिल्लीत असतील व त्यांच्या अनौपचारिक बैठक होणार असल्याचे समजते.
News English Summary: It is understood that the second round of discussions to review the political situation in Uttar Pradesh will be held in the presence of Sarsanghchalak Mohan Bhagwat. Sarsanghchalak will arrive in Delhi on Thursday to hold meetings of senior Sangh leaders. In Uttar Pradesh, where assembly elections are to be held in eight months, a think tank meeting was held between the Sangh and BJP leaders last week.
News English Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 meeting will be held in the presence of Sarsanghchalak Mohan Bhagwat news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार