14 November 2024 9:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News EPFO Monthly Pension | पगारदारांनो, तुम्हाला तुमचा PPO नंबर ठाऊक आहे का, अन्यथा पेन्शन विसरा, असा मिळवा PPO नंबर
x

राज्यातील हे जिल्हे पहिल्या टप्प्यात होणार अनलॉक | पहा तुमचा जिल्हा आहे का?

Maharashtra UnLock

मुंबई, ०३ जून | राज्य सरकारने महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामध्ये ५ टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली आहे.

सध्याच्या परिस्थितीत ५ टप्प्यांमध्ये अनलॉक केलं जाणार आहे. या ५ टप्प्यांपैकी पहिल्या श्रेणीनुसार ज्या जिल्ह्यात ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल.

पूर्ण अनलॉक लागू होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, सायकलिंक ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, खासगी कार्यालये, सरकारी कार्यालयांना १०० टक्के मुभा, क्रीडांगणे आणि थिएटर्सला परवानगी असेल. शूटिंगला देखील परवानगी असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असेल. लग्नसोहळ्यांना देखील १०० टक्के उपस्थितीची परवानगी असेल”, असं वडेट्टीवार म्हणाले.

अनलॉक कोणत्या टप्प्यात होणार:
पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे
दुसर्‍या टप्प्यात 5 जिल्हे
तिसरा 10 जिल्हे
चौथ्या टप्प्यात 2 जिल्हे

पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे:
औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर,धुळे गडचिरोली गोंदिया जळगाव, जालना लातूर नागरपूर नांदेड नाशिक परभणी,ठाणे ,वर्धा. वाशिम .यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे.

मुंबई दुस-या लेव्हलमध्ये:
मुंबईत आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला तर मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू होतील. सध्या मुंबईत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंदच असणार आहेत. ठाणे पहिल्या टप्प्यात येत असला तरी तिथे लोकल प्रवासाला मुभा नसेल

उद्यापासून याची अंमलबजावणी सुरू होणार
दर आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेणार आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट बघून जिल्ह्याचे टप्पे बदलण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x