22 November 2024 5:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

VIDEO | बदलापुरात वायुगळती | नागरिकांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास

बदलापुर, ०४ जून | एमआयडीसी भागात वायुगळती झाल्याने शिरगाव आपटेवाडी या परिसरात ३ किमीच्या परिघात लोकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. वायुगळतीमुळे काहींना उलट्या आणि खोकल्याचा त्रास देखील जाणवू लागला. मात्र ही वायुगळती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे. ही घटना सुमारे १०.२० वाजण्याच्या सुमारास घडली.

बदलापूर पूर्व MIDC भागातील एका केमिकल प्लांटमध्ये वायू गळती झाली असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला कळताच त्यांनी तात्काळ कारवाई करत सदर कंपनीमध्ये जाऊन वायू गळतीचे कॉक बंद करण्यात आले असल्याची माहिती दिली. मात्र या वायुगळती मुळे लोकांना उलच्या आणि श्वसनाचा त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी देखील पुढे आल्या आहेत. एमआयडीसी भागातील नोबेल इंटरमीडिएट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून ओव्हरहीटमुळे ही वायूगळती झाल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये एका रिॲक्टरमध्ये सल्फ्युरिक ॲसिड आणि बेंझाईन डिहायड्रेड या दोन केमिकल्स मिश्रण सुरू होतं. मात्र त्यासाठी लागणारा तापमान नियंत्रित करताना चूक झाल्याने या रिॲक्टरमधून वायुगळती झाली. मात्र हा वायू ज्वलनशील नाही. असे असले तरी हा वायू श्वास घेण्यास त्रासदायक ठरणारा असून त्वचा, डोळे,यांना काही प्रमाणात बाधा करणारा आहे.

 

News English Summary: Due to air leakage in MIDC area, people started experiencing respiratory problems within a radius of 3 km in Shirgaon Aptewadi area. The incident caused a single panic among the citizens. Some also experienced vomiting and coughing due to the air leak. However, the fire brigade has clarified that the leak is under control and there is no reason for the citizens to panic. The incident took place around 10.20 am.

News English Title: Gas leakage in Badlapur people suffer breathing problem and vomiting news updates.

हॅशटॅग्स

#GasLeak(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x