14 November 2024 8:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News EPFO Monthly Pension | पगारदारांनो, तुम्हाला तुमचा PPO नंबर ठाऊक आहे का, अन्यथा पेन्शन विसरा, असा मिळवा PPO नंबर
x

VIDEO | पिंपळाला लागलाय आंबा? | व्हिडीओ'मागील सत्य समोर आलं

Mango on a pimple tree

देहरादून, ०४ जून | तुम्ही कधी पिंपळाच्या झाडावर आंबा पाहिलाय? नाही ना? पण समाज माध्यमांवर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. पिंपळाच्या झाडावर आंबा लागल्याचा दावा व्हिडीओसोबत केला जात आहे. हा व्हिडीओ उत्तराखंडच्या ऋषीकेशमधील असल्याचा दावा आहे. ऋषीकेशच्या त्रिवेणी घाटाजवळ असलेल्या पोलीस चौकीजवळील पिंपळाच्या झाडावर तीन आंबे पाहिल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे, असा मजकूर व्हिडीओसोबत आहे.

पिंपळाच्या झाडाला आंबे हा चमत्कार असल्याचा अनेकांचा दावा आहे. मात्र सत्य वेगळं आहे. व्हायरल व्हिडीओसोबत केला जाणारा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं पडताळणीत समोर आलं.

वास्तविक काही दिवसांपूर्वी या परिसरात वादळ आलं होतं. सोसाट्याचा वारा सुटल्यानं जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाच्या काही फांद्या तुटल्या आणि त्या पिंपळाच्या फांद्यांमध्ये जाऊन अडकल्या. आंब्याच्या झाडाच्या तुटलेल्या फांद्यांना आंबे लागलेले होते. ते पिंपळाच्या फांद्यांवर अडकले. त्यामुळे पिंपळाला आंबे लागल्यासारखं चित्र दिसू लागलं. याचा व्हिडीओ काहींनी काढला आणि तो पुढे व्हायरल झाला.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x