Health First | आहारात पुदिन्याची चटणी आणि त्याचे आरोग्यदायी फायदे
मुंबई, ०४ जून | पुदिन्याची चटणी, जलजीरा किंवा मग एखाद्या रायत्यावर सजवण्यात आलेली पुदिन्याची पानं असोत. कोणत्याही जेवणाची चव वाढविण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात. उन्हाळ्यामध्ये यांचं महत्त्व आणखी वाढतं. उन्हामधून थकून आल्यानंतर थोडासा जलजीरा प्यायल्यानेही फ्रेश वाटतं. याची चवीएवढाचं याचा वापर करणंही सोपं आहे. पुदिना चवीसोबतच उन्हाळ्यातील इतर समस्यांवर औषधं म्हणून वापरता येतो. जाणून घेऊया पुदिन्याच्या काही आरोग्यदायी फायद्यांबाबत..
पुदिन्याच्या पानांपासून तयार करण्यात आलेल्या चटणीचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. याची चटपटीत चव जेवणाचा आनंद द्विगुणित करण्यास मदत करते. तसेच आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात.
पचनक्रिया सुधारण्यासाठी:
पुदिन्यामधील अनेक पोषक तत्व पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यासोबतच इतर समस्याही दूर करते. पुदिनामुळे जेवलेले चांगल्या पद्धतीने पचते अर्थात पचन व्यवस्था सुस्थितीत राहते. एक चांगला मेटाबॉलिज्म वजन कमी करण्यास मदत करतो. अशा परिस्थितीत पुदिन्याची चटणी खूप उपयोगी ठरते.
वजन कमी करण्यास अत्यंत उपयुक्त:
तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर पुदिन्याचे सेवन अवश्य करा. कारण वजन नियंत्रित करण्यास पुदिना अत्यंत उपयुक्त असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.
तोंडाचे आरोग्य उत्तम राहते:
पुदिनामुळे तोंडाचे आरोग्य उत्तम राहते. अर्थात पुदिना तोंडाच्या आतील भागात बॅक्टेरियाची वाढ होऊ देत नाही. याशिवाय दातांवरील डाग साफ करण्यास पुदिनाची मदत होते. तसेच जीभ आणि हिरड्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होते. पुदिनाची पाने चावत राहिल्यामुळे तोंडाला दुर्गंधी येत नाही.
मांसपेशीच्या वेदनांपासून दिलासा:
जर तुम्हाला मांसपेशीमध्ये वेदना होत असतील तर पुदिन्याची चटणी अवश्य खा, आपल्या डायटमध्ये पुदिनाच्या चटणीचा समावेश करा. याशिवाय सामान्य डोकेदुखीपासूनही पुदिनामुळे दिलासा मिळतो. पुदिनाचे तेज आणि ताजा स्वाद डोकेदुखी कमी करण्यास मोठी मदत करू शकतो.
सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो:
पुदिन्यामुळे नाक, गळा आणि फुफ्फुस स्वच्छ ठेवण्यास मदत होते. पुदिन्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. याच गुणधर्मामुळे पुदिनाचे सेवन केल्यानंतर अगदी खूप वर्षांपासून त्रास देत असलेल्या खोकल्यापासून आराम मिळतो. खोकल्यामुळे गळ्यात होणारी जळजळ थांबते. परिणामी, फुफ्फुस स्वस्थ राहते.
इम्युनिटी वाढवण्यास उपयोगी:
सध्याच्या कोरोना काळात संसर्ग रोखण्यासाठी शरीरात स्ट्रॉंग इम्युनिटी पॉवर असण्याची गरज आहे. जर तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर पुदिन्याची चटणी अवश्य आहारात अंतर्भूत करा. पुदिन्याची चटणी खाऊन तुम्ही प्रतिकारशक्ती वाढवाल, त्यामुळे तुमच्या शरीरातील विविध प्रकारच्या व्याधी दूर पळतील.
News English Summary: Be it mint Pudina chutney, jaljira or mint leaves garnished on a raita. Extremely useful for enhancing the taste of any meal. Their importance increases even more in summer. After getting tired from the sun, drinking a little water cumin also makes you feel fresh. It is as easy to use as it tastes.
News English Title: Mint leaves Pudina Chatni health benefits article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS