14 November 2024 8:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News EPFO Monthly Pension | पगारदारांनो, तुम्हाला तुमचा PPO नंबर ठाऊक आहे का, अन्यथा पेन्शन विसरा, असा मिळवा PPO नंबर
x

परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही - संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut

मुंबई, ०५ जून | तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना लोकसत्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा सवाल करण्यात आला होता. तेव्हा, म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणालो, अशी हजरजबाबी प्रतिक्रियाही राज यांनी दिली होती.

दरम्यान, राजकारण हे आपलं आपण करायचं असतं. राजकारणात परमेश्वरावर विसंबून राहणाऱ्या व्यक्तीला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

याविषयी संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढला. परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसं प्रतिउत्तर देणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x