14 November 2024 8:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News EPFO Monthly Pension | पगारदारांनो, तुम्हाला तुमचा PPO नंबर ठाऊक आहे का, अन्यथा पेन्शन विसरा, असा मिळवा PPO नंबर
x

केंद्राकडून 'या' महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा | काळजी घेण्याचा सल्ला

Corona third wave

नवी दिल्ली, ०५ जून | कोरोना व्हायरसची दुसरी लाट आता काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. पण कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकराक आहे. कारण देशात तिसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत. नीती आयोगाचे सदस्य व्ही.के सारस्वत यांच्या म्हणण्यानुसार आपण कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात यशस्वी ठरलो आहोत. पण आता कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेतून बाहेर येण्यासाठी योग्य ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा तरुणांना अधिक धोका आहे. असं सांगितलं जात आहे. सारस्वत म्हणाले की, देशात कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य असल्याचे स्पष्ट संकेत रोग विशेषज्ञांनी दिले आहे. कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात लसीकरण जलद गतीने होणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

सारस्वत पुढे म्हणाले, ‘आतापर्यंत आपण चांगलं काम केलं आहे. त्यांमुळे कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत आहे.वैज्ञानिक आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांची मदत, ऑक्सिजन बँक, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी उद्योगांची स्थापना, ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी रेल्वे, विमानतळ, सैन्य दलांचा उपयोग केला जात आहे.’

देशात याआधी रोज 4 लाखांपेक्षा जास्त नव्या कोरोना रूग्णांची नोंद केली जात होती. पण आता तो सतत वाढणारा आकडा मंदावला आहे. आता रोज देशात जवळपास 1.3 लाख नव्या रूग्णांची नोंद होत आहे. शिवाय कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.

News English Summary: Young people are more at risk from the third wave of corona. That is being said. Saraswat said pathologists have given a clear indication that a third wave of corona is inevitable in the country. The third wave of corona is expected in September-October. Therefore, it is very important for the country to get vaccinated at a faster pace.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x