24 November 2024 8:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

मोर्चातील मेटेंच्या भाषणात केंद्राच्या जवाबदारीचा उल्लेखच नाही | फक्त फडणवीसांचा जयजयकार अन राज्य सरकारवर टीका

Maratha reservation

बीड, ०५ जून | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. येत्या 5 जुलैपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. अन्यथा 7 जुलैला सुरु होणारं पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, अशा शब्दात मेटे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाची लढाई फक्त आजच्या मोर्चापुरती नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर हा लढा सुरुच राहणार, ही तर फक्त सुरुवात आहे, असंही मेटे यांनी म्हटलंय.

दरम्यान, विनायक मेटेंनी केलेल्या भाषणबाजीत मराठा आरक्षण मिळण्यासाठी काय करावं लागेल याकडे डोळेझाक करताना केंद्राच्या हातात असलेल्या मुद्यांकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये सुप्रीम कोर्टाने केंद्राच्या हातात असलेल्या मुद्यांकडे केलेल्या निर्देशाकडे मेटेंनी डोळेझाक केल्याचं पाहायला मिळालं. एकूण भाषणात त्यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर टीका आणि फडणवीसांचा जयजयकार हाच जुना पाढा वाचल्याचं निदर्शनास आलं आहे.

बीडमध्ये आज विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मराठा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मेटे यांनी ठाकरे सरकार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. अशोक चव्हाण यांच्यासारखा नाकर्ता माणूस आजपर्यंत झालेला नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा बापट आयोगाच्या शिफारशी फेटाळण्याची मागणी आम्ही केली होती. पण त्याकडे अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केलं. 2014 ला सुद्धा जे आरक्षण दिलं ते ही चुकीचं दिलं, त्याची फळं आज आपण भोगतोय. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आरक्षण अतिशय चांगलं होतं. पण या माणसाच्या मुर्खपणामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे घालवलं, असा घणाघाती आरोपही मेटे यांनी यावेळी केलाय. इतकच नाही तर मराठा आरक्षण, मराठा समाजाला सवलती आणि अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्या. त्यासाठी 5 जुलैपर्यंतची वेळ देतो. नाहीतर 7 जुलैला होणारं पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा मेटे यांनी दिलाय.

 

News English Summary: In the speech made by Vinayak Mete, while turning a blind eye to what needs to be done to get Maratha reservation, it was seen that the issues in the hands of the Center were completely overlooked. In this, it was seen that Mete had turned a blind eye to the directions given by the Supreme Court to the issues in the hands of the Center. In his overall speech, it has been observed that he has read the old thoughts, criticizing the ministers in the state government and applauding Fadnavis.

News English Title: Shivsangram leader Vinayak Mete warns Thackeray government on rainy session of legislature news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x