शेतकऱ्यांनो! | तलाठी कार्यालयात हेलपाटे न मारता मिळवा शेतजमिनीचा असा ऑनलाईन 'डिजिटल 8-अ'
मुंबई, ०५ जून | डिजिटल 8अ (Digital 8A ) म्हणजे वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असतो. तसेच अनेक योजनांसाठी हे कागदपत्र आवश्यक असते. 8अ काढण्यासाठी अनेकदा तलाठी कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागत असत, मात्र आता डिजिटल 8अ मुळे आपणास घरबसल्या देखील हा दाखला मिळणार आहे, तो कसा काढावा याबाबत सर्व माहिती जाणून घेऊयात,
डिजिटल 8अ काढण्यासाठी प्रथम आपल्याला पुढील लिंक वर क्लिक करा. https://bhulekh.mahabhumi.gov.in/
‘न्यू यूजर रजिस्ट्रेशन’ (‘New user registration’) करण्याकरिता काय करावे?
- जर तुम्ही प्रथमच ह्या वेबसाईटवर आला असाल यापूर्वी तुम्ही याचा लाभ घेतला नसेल तर प्रथम तुम्हाला ‘न्यू यूजर रजिस्ट्रेशन’ पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- या पर्यायावर क्लिक केल्यावर तिथे एक फॉर्म दिसेल
- या फॉर्म मध्ये तुमची वैयक्तिक माहिती संपूर्ण नाव भरायचे आहे. त्यानंतर जेंडर (मेल आहे की फिमेल), नॅशनॅलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर द्या. अशी माहिती लिहा.
- त्यानंतर Occupation म्हणजे तुमचा व्यवसाय उदाहरणार्थ शेती, व्यवसायिक, म्हणजेच तुम्ही काय करता, या पर्यायांची माहिती द्या.
- यानंतर मेल-आयडी आणि जन्मतारखेचा रकाना भरा माहिती भरून झाल्यानंतर पत्त्याविषयी संपूर्ण व्यवस्थित माहिती भरा यामध्ये घर क्रमांक, गावाकडे राहात असाल तर ग्राउंड फ्लोअर, घरावर काही नाव असेल तर ते टाका.
- त्यानंतर Pincode टाकायचा आहे. पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचे नाव आपोआप फॉर्मवर येईल.
- त्यापुढे गल्लीचे नाव, गावाचे नाव, City तालुक्याचे नाव टाका. अशी संपूर्ण माहिती व्यवस्थित लिहा
- ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग आयडी तयार करायचा आहे.
- लॉग-इन आयडी टाकला की त्यानंतर Check availability या पर्यायावर क्लिक करून तो आयडी अगोदरच अस्तित्वात आहे की नाही ते पाहा. तो जर नसेल तर त्यानंतर पासवर्ड टाका. त्यानंतर येथे दिलेल्या चार-पाच सोप्या प्रश्नांपैकी एकाचे उत्तर द्या.
- त्यानंतर कॅप्टचा टाईप करायचा आहे. Captcha समोर दिसणारा कॅपच्या आहे तसा बरोबर लिहा.
- शेवटी सबमिट बटण दाबा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर रजिस्ट्रेशन कम्प्लिट असा मेसेज येईल तेव्हा “क्लिक हिअर या पर्यायावर क्लिक करा. रजिस्ट्रेशन करताना टाकलेले यूजर नेम आणि पासवर्ड वापरून परत लॉग इन करा.
- त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर “Digitally Signed 8-A” हा दुसरा पर्याय तुम्ही पाहू शकता. या पर्यायावर क्लिक केलं की “डिजिटल स्वाक्षरीत 8-अ’ असे शीर्षक असलेले पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
- जर तुम्ही यापूर्वी या वेबसाईटला भेट दिली असेल, म्हणजे सातबारा वगैरे काढला असेल जर तुमच्याकडे जुना लॉगिन आयडी असेल तर तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता.
- वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला उजवीकडे Digitally Signed 7/12 किंवा डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी या पर्यायावर क्लिक करा.
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे नवीन पेज ओपन होईल,येथे डिजिटल स्वाक्षरीतला सातबारा, 8-अ आणि प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकता.
- वेबसाईटवर नोंदणी केली असेल, म्हणजे या अगोदर सातबारा उतारा काढला असेल तर लॉगइन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील इतर सेवांचा लाभ घेऊ शकता.
डिजिटल 8अ चा फायदा अनेक योजनांसाठी होतो:
याचाच अर्थ पीक कर्ज, पीक विमा आणि इतर अनेक शेतीसंबंधीच्या वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी डिजिटल सातबारा उतारा आणि 8-अ खाते उतारा अधिकृतपणे वापरू शकतात.
News English Summary: Digital 8A (Digital 8A) is a collection of farmland information of many farmers divided into different group numbers. This document is also required for many schemes. To get 8A, you often had to go to the Talathi office, but now with digital 8A, you can get this certificate even if you are at home, let’s know all the information on how to get it.
News English Title: Online Digital 8A for farmers easy steps to get it easily from Mahabhumi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल