14 November 2024 8:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News EPFO Monthly Pension | पगारदारांनो, तुम्हाला तुमचा PPO नंबर ठाऊक आहे का, अन्यथा पेन्शन विसरा, असा मिळवा PPO नंबर
x

Rain Alert | मान्सून पुण्यात दाखल, अपेक्षेपेक्षा लवकर राज्य व्यापणार

Monsoon in Pune

पुणे, ०६ जून | नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पाऊस अखेर पुण्यात दाखल झाला आहे. मान्सूनचा पाऊस शनिवारी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून (राज्यभरात वेगाने आगेकूच करत आहे. कोकण परिसरात मान्सून अलिबागपर्यंत पोहोचला आहे. मान्सूनचा सध्याचा वेग पाहता तो अपेक्षेपेक्षा लवकर राज्य व्यापेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

राज्यातील बहुतांश शेतकरी हे शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावले आहेत. मान्सून राज्यात दाखल झाल्याने आता शेतीच्या कामांना वेग आला आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x