24 November 2024 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

देशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी

Congress leader Rahul Gandhi

नवी दिल्ली, ०६ जून | नवे आयटी नियम लागू न केल्याने शनिवारी सरकारने ट्विटरला अंतिम नोटीस पाठवली. यात म्हटले आहे की, २६ मेपासून लागू सोशल मीडियासाठीच्या नव्या नियमांचे ट्विटरने त्वरित पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे ट्विटरने शनिवारी अचानक टाकलेल्या पावलांनंतर केंद्राने ही नोटीस बजावली.

सकाळी ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या खासगी अकाउंटची ब्ल्यू टिक हटवली. नंतर काही वेळाने ती पुन्हा बहाल केली. सरसंघचालक मोहन भागवत व संघाच्या इतर नेत्यांच्या अकाउंटमधूनही ब्ल्यू टिक हटवण्यात आली. संध्याकाळी पुन्हा बहाल करण्यात आली. अकाउंट निष्क्रिय राहिल्यास ब्ल्यू टिक हटवली जाते असे ट्विटरचे म्हणणे आहे.

देशभरात सध्या केंद्र सरकार विरुद्ध ट्विटर असा वाद सुरु असलेला पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारन सोशल मीडियासाठी ठरवून दिलेल्या नियमावलीचं पालन ट्विटरकडून केलं जात नाहीये. त्यामुळे एकीकडे केंद्र सरकारनं ट्विटरला शेवटची नोटीस बजावली असताना दुसरीकडे ट्विटरकडून थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघचालक मोहन भागवत आणि संघाशी संबंधित इतर अनेकांच्या ट्विटल हँडलची ‘ब्लू टिक’ काढून घेतल्यामुळे मोठा गदारोळ झाला.

दरम्यान, देशात सध्या लसींच्या तुटवड्याची समस्या उभी राहिली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत ऑक्सिजन तुटवड्याची समस्या होती. त्याशिवाय रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड या समस्या देखील समोर येत आहेत. यावर सातत्याने राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात करोनासाठीच्या लसींचा तुटवडा असताना केंद्र सरकार मात्र ट्विटरच्या मागे लागले असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे.

“ब्लूट टिकसाठी मोदी सरकार भांडत आहे, कोविडची लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा”, असं सूचक आणि खोचक ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे. तसेच, या ट्वीटसोबत #Priorities देखील लिहिलं आहे. त्यामुळे करोनाच्या संकटकाळात लसींचा तुटवडा असताना मोदी सरकार मात्र ट्विटरच्या ब्लू टिकला प्राधान्य देत असल्याची खोचक टीका त्यांनी केली.

 

News English Summary: The country is currently facing a shortage of vaccines. Until a few days ago there was a problem of oxygen shortage. Apart from that, problems like remedivir injection and oxygen bed are also coming up. Rahul Gandhi has consistently targeted this. Against this backdrop, Rahul Gandhi has criticized the central government for following Twitter when there is a shortage of vaccines for corona in the country.

News English Title: Congress leader Rahul Gandhi mocks Modi government on Twitter Blue Tick Clash news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x