22 November 2024 12:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोना संपलेला नाही | गर्दी, आरोग्याचे नियम मोडलेले चालणार नाही - मुख्यमंत्री

Maharashtra UnLock

मुंबई, ०७ जून | महाराष्ट्रात सोमवारपासून ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होत आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद मनपा क्षेत्र, जालना, नांदेड आणि लातूर शहर पहिल्या स्तरात असल्यामुळे या ठिकाणी सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होणार आहेत. मात्र मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे या गोष्टी अनिवार्य असून औरंगाबाद शहरात व्यापाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. नाशिक, सोलापूर जिल्ह्यांमध्ये सकाळी ७ ते ४, तर जळगाव जिल्ह्यात सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही पहिल्या लाटेच्या तुलनेत मृतांची संख्या जास्त आहे. रविवारी महाराष्ट्रातील कोरोना मृतांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला. देशात कोरोनामुळे सर्वाधिक बळी महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची नितांत गरज आहे. दरम्यान, कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही. राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांना दिले.

तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन अधिक काळजी घ्या व सावध रहा, रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा आहे असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलिस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले.

नव्या आदेशात वर्गीकरण केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत कोविडला आमंत्रण देणारी गर्दी , समारंभ, सोहळे चालणार नाहीत. आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे असे जिल्हा प्रशासनाने पाहायचे आहे. दैनंदिन व्यवहार किती उघडायचे, किती काळ सुरू ठेवायचे, त्याच्या वेळा या सर्व बाबी त्या त्या भागातील प्रशासनाने ठरवायचे आहे,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोरोना रुग्णाच्या संख्येत चढ उतार होत असतात. आपण लेव्हल्स ठरविल्या असल्या तरी संसर्ग किती वाढेल याविषयी आपल्या मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घाला , कुठल्याही दबावाला बळी पडू नका. निर्णयाचा अधिकार सर्व स्थानिक जिल्हा प्रशासनाना दिला आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा आहे,असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

News English Summary: Restrictions are being relaxed in all districts of Maharashtra under ‘Break the Chain’ from Monday. In Marathwada, Aurangabad Municipal Corporation, Jalna, Nanded and Latur are in the first tier, so all transactions will start as usual. However, wearing a mask and observing physical distance are mandatory and RTPCR testing has been made mandatory for traders in Aurangabad. In Nashik and Solapur districts, concessions have been given from 7 am to 4 am, while in Jalgaon district, concessions have been given from 9 am to 9 pm.

News English Title: Restrictions are being relaxed in all districts of Maharashtra under Break the Chain from Monday news updates.

हॅशटॅग्स

#Unlock(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x