25 November 2024 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

NEET प्रवेश प्रक्रिया; विद्यार्थ्यांची ही समस्या कशी सुटली? राज ठाकरेंनी प्रसिद्ध केली चित्रफीत

मुंबई : मागील काही महिन्यांपासून वैद्यकीय ‘NEET’ प्रवेश प्रक्रियेचा तिढा स्थानिक विद्यार्थी आणि पालकांसाठी राज्य सरकारच्या अनास्थेमुळे अधिकच किचकट ठरला होता. अनेक विद्यार्थी आणि पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून दिल्या होत्या. अखेर त्या लढ्याला न्यायालयामार्फत सुद्धा यश मिळालं आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेज’वर या विद्यार्थ्यांची ती समस्या कशी सुटली त्याचा संपूर्ण आढावा घेणारी चित्रफीत प्रसिद्ध केली आहे.

काय आहे ती पोस्ट;

वैद्यकीय (NEET) प्रवेश प्रक्रियेत स्थानिक विद्यार्थ्यांनाच प्रथम प्राधान्य मिळावं’ ह्या अधिवास नियमाच्या अंमलबजावणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केलं. मग परप्रांतीयांनी त्याचा फायदा उचलला आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रवेशावर न्यायालयातून स्थगिती आणली. ही तक्रार महाराष्ट्रातील पालकांनी श्री. राज ठाकरे ह्यांच्याकडे मांडली. त्यानंतर श्री.राज ठाकरे ह्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन, “महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच प्राधान्य मिळायलाच हवं” अशी परखड भूमिका मांडली.

मा. न्यायालयानेही ही बाब समजून घेऊन उलटपक्षी सरकारचेच कान उपटले आणि स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरील स्थगिती उठवली.
विद्यार्थ्यांची ही समस्या कशी सुटली ह्याचा आढावा घेणारी ही चित्रफीत. जरूर पहा.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x