22 November 2024 12:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राज्याला दीड कोटी लस देण्याचं ठरवलं होतं, मोदी सरकारनंच पुनावालांना धमकी दिली | राष्ट्रवादीच्या या नेत्याकडून गंभीर आरोप

Adar Poonawala

कोल्हापूर, ०७ जून | केंद्र सरकारने धमकी दिल्याने सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला लंडनमध्ये गेल्याचा गंभीर आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. पूनावाला यांनी महाराष्ट्राला दीड कोटी लस देण्याचं ठरवलं होतं, अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली आहे. इतकंच नाही क येत्या २ दिवसांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याचंही हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली त्यावेळी जूनपासून दीड कोटी लसी द्यायचं त्यांनी ठरवलं होतं. मात्र, त्यांना केंद्राकडून धमक्या देण्यात आल्या. त्यानंतर ते लंडनला जाऊन बसलेले आहेत. केंद्र सरकारने धमकी दिल्यामुळे त्या लशी राज्याला मिळाल्या नाही. एकीकडे राज्य सरकारला डोस द्यायला सांगायचे आणि दुसरीकडे बाजूला धमक्या देण्याचा प्रकार घडला आहे”

दरम्यान, कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम संस्थेचे अदर पुनावाला यांनी धमकी दिल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे हे प्रकरण हायकोर्टात गेले होते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घ्या, अशी आठवण मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला करून दिली होती. तसेच पुनावाला यांच्या सुरक्षिततेबाबतचा अहवाल पुढील सुनावणीत सादर करण्याचे निर्देश दिले प्रशासनाला दिले होते. कोरोनाच्या कठीण काळात कोविशिल्ड ही लस तयार करून देशाच्या हितासाठी भरीव कामगिरी केली आहे, असं कोर्ट म्हणालं होतं.

दरम्यान, अदर पुनावालांना सध्या ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने खंडपीठाला देण्यात आली. तर दुसरीकडे, केंद्र सरकारकडून पुनावाला यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवानही तैनात करण्यात आल्याचंही कोर्टात सांगण्यात आलं होतं.

 

News English Summary: Rural Development Minister Hasan Mushrif has made a serious allegation that Serum Institute CEO Adar Punawala went to London after receiving threats from the central government. Mushrif also said that Poonawala had decided to give Rs 1.5 crore to Maharashtra. Not only that, in the next two days, NCP President Sharad Pawar will visit the Serum Institute, said Hasan Mushrif.

News English Title: NCP leader Hasan Mushrif made serious allegation on Modi govt over threating Adar Poonawala news updates.

हॅशटॅग्स

#HasanMushrif(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x