24 November 2024 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन
x

BREAKING | मॅगीचे 30% तर नेस्ले कंपनीची ६०% उत्पादने आरोग्यास पोषक नाहीत | कंपनीचीही कबुली

Maggi and Nestle company

नवी दिल्ली, ०८ जून | भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मॅगी पुन्हा चर्चेत आली आहे. एका ताज्या अहवालानुसार मॅगीसह नेस्ले कंपनीची ६० टक्के उत्पादने आणि पेय आरोग्यासाठी पोषक नसल्याचा ठपका ठे‌‌वण्यात आला आहे. त्यानंतर आता नेस्ले कंपनीनेही त्याची कबुली दिली आहे. जागतिक बाजारपेठेतील ३० टक्के उत्पादने आरोग्यासाठी पोषक (अनहेल्दी) नसल्याचे नेस्लेने मान्य केले आहे. ही सर्व उत्पादने विविध देशांच्या मानकानुसार नाहीत. काही उत्पादने यापूर्वीही सकस नव्हती आणि नंतरही त्यांचा आरोग्यासाठी पोषक नसलेल्या श्रेणीतच समावेश झाला आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

किटकॅट आणि मॅगी बनवणाऱ्या नेस्लेचे प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेते. तसेच पुढील काही दिवसांत ग्राहकांसोबत अधिक संवाद साधणार आहे. एका अंतर्गत अहवालात नेस्लेच्या उत्पादनांच्या सकस, पोषकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यामध्ये जागतिक बाजारपेठेतील केवळ अर्ध्या उत्पादनांचाच समावेश होता. यामध्ये अनेक प्रमुख उत्पादनांना गृहीत धरले नव्हते. अर्थात, भारतीय बाजारपेठेतील किती टक्के उत्पादने आरोग्यासाठी पोषक आहेत अथवा नाहीत यासंबंधी प्रवक्त्याने बोलणे टाळले.

‘इंटरनॅशनल बेबी फूड अॅक्शन नेटवर्क’चे विभागीय समन्वयक डॉ. अरुण गुप्ता म्हणाले की, उत्पादने ‘हेल्दी’ आहेत की ‘अनहेल्दी’ याचा उल्लेख नेस्ले आपल्या उत्पादनांवर का करत नाही? दुधाव्यतिरिक्त कुठल्याही दोन पदार्थांपासून तयार केलेला खाद्यपदार्थ अल्ट्रा प्रोसेस्ड असतो. जागतिक निर्देशांनुसार, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे भारतात विकली जाणारी नेस्लेची बहुतांश उत्पादने ‘अनहेल्दी’ श्रेणीत येतात. पण भारतात आतापर्यंत अल्ट्रा प्रोसेस्ड फूडबाबत कुठलेही नियम नाहीत. कंपन्या त्याचाच फायदा घेत आहेत.

 

News English Summary: Maggi, the most popular in the Indian market, is back in the spotlight. According to a recent report, 60 per cent of Nestle’s products and beverages, including Maggie’s, have been found to be unhealthy. Since then, Nestle has also confessed. Nestl acknowledges that 30% of the products on the world market are unhealthy.

News English Title: Maggie and Nestle company products are unhealthy said Dr Gupta on report news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x