BREAKING | मॅगीचे 30% तर नेस्ले कंपनीची ६०% उत्पादने आरोग्यास पोषक नाहीत | कंपनीचीही कबुली
नवी दिल्ली, ०८ जून | भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मॅगी पुन्हा चर्चेत आली आहे. एका ताज्या अहवालानुसार मॅगीसह नेस्ले कंपनीची ६० टक्के उत्पादने आणि पेय आरोग्यासाठी पोषक नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानंतर आता नेस्ले कंपनीनेही त्याची कबुली दिली आहे. जागतिक बाजारपेठेतील ३० टक्के उत्पादने आरोग्यासाठी पोषक (अनहेल्दी) नसल्याचे नेस्लेने मान्य केले आहे. ही सर्व उत्पादने विविध देशांच्या मानकानुसार नाहीत. काही उत्पादने यापूर्वीही सकस नव्हती आणि नंतरही त्यांचा आरोग्यासाठी पोषक नसलेल्या श्रेणीतच समावेश झाला आहे, असेही अहवालात म्हटले आहे.
किटकॅट आणि मॅगी बनवणाऱ्या नेस्लेचे प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेते. तसेच पुढील काही दिवसांत ग्राहकांसोबत अधिक संवाद साधणार आहे. एका अंतर्गत अहवालात नेस्लेच्या उत्पादनांच्या सकस, पोषकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यामध्ये जागतिक बाजारपेठेतील केवळ अर्ध्या उत्पादनांचाच समावेश होता. यामध्ये अनेक प्रमुख उत्पादनांना गृहीत धरले नव्हते. अर्थात, भारतीय बाजारपेठेतील किती टक्के उत्पादने आरोग्यासाठी पोषक आहेत अथवा नाहीत यासंबंधी प्रवक्त्याने बोलणे टाळले.
‘इंटरनॅशनल बेबी फूड अॅक्शन नेटवर्क’चे विभागीय समन्वयक डॉ. अरुण गुप्ता म्हणाले की, उत्पादने ‘हेल्दी’ आहेत की ‘अनहेल्दी’ याचा उल्लेख नेस्ले आपल्या उत्पादनांवर का करत नाही? दुधाव्यतिरिक्त कुठल्याही दोन पदार्थांपासून तयार केलेला खाद्यपदार्थ अल्ट्रा प्रोसेस्ड असतो. जागतिक निर्देशांनुसार, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे भारतात विकली जाणारी नेस्लेची बहुतांश उत्पादने ‘अनहेल्दी’ श्रेणीत येतात. पण भारतात आतापर्यंत अल्ट्रा प्रोसेस्ड फूडबाबत कुठलेही नियम नाहीत. कंपन्या त्याचाच फायदा घेत आहेत.
News English Summary: Maggi, the most popular in the Indian market, is back in the spotlight. According to a recent report, 60 per cent of Nestle’s products and beverages, including Maggie’s, have been found to be unhealthy. Since then, Nestle has also confessed. Nestl acknowledges that 30% of the products on the world market are unhealthy.
News English Title: Maggie and Nestle company products are unhealthy said Dr Gupta on report news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY