पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या 'या' मागण्या
नवी दिल्ली, ०८ जून | मी वर्षभराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो. भेटीचा हेतू मी आधीच जाहीर केला आहे. आमच्या 12 मागण्या होत्या त्याबद्दल त्यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना कल्पना दिली. त्यांनी आमच्या मागण्या ऐकून घेतल्या. आम्हाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपल्या मागण्यांची माहिती घेतो असंही आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. सगळे विषय त्यांनी गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय आम्ही मांडले आहेत त्याला सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आम्ही कोण कोणते विषय़ पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे मांडले?
- मराठा आरक्षणाचा अत्यंत संवेदनशील विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडला. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्याबद्दल योग्य ती भूमिका घ्यावी अशी विनंती केली.
- 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करण्यात यावी
- इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज निवडणुकीतील राजकीय आरक्षण हा देशपातळीवरचा विषय होऊ शकतो
- मागासवर्गीयांचं बढतीमधील आरक्षण हा विषयही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडला आहे
- मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा उपलब्ध करून देण्याचा विषयही आम्ही पंतप्रधानांकडे मांडला
- GST चं येणं लवकर मिळावं यासाठीही विनंती केली आहे
- शेतकऱ्यांच्या पिक विम्याबाबत अटी-शर्थी संबंधी आम्ही बीड मॉडेल तयार केलं आहे त्याबद्दलही चर्चा केली
- बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
- गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रीवादळं आदळत आहेत, तौक्ते वादळानेही दणका दिला. या वेळी जे मदत केली जाते ते निकष जुने झाले आहेत. आता ते निकष बदलण्याची गरज आहे याबाबतही आम्ही चर्चा केली
- चौदाव्या वित्त आयोगातील थकित निधी मिळण्याबाबत चर्चा केली
- मराठी भाषा दिन असतो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंबंधी योग्य ती पावलं उचलली जावीत अशीही विनंती केली.
अशोक चव्हाण यांनी यावेळी नरेंद्र मोदींसमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षणातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील महत्वाचे मुद्दे मोदींच्या निदर्शनास आणून दिले असं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ‘आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करावी, अन्यथा राज्यांना अधिकार देऊनही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही’ अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. तसा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे असं मतही यावेळी त्यांनी व्यक्त केलं.
तुमच्याकडे अधिकार असताना निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी विनंती मोदींना करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मराठा असो किंवा ओबीसी आरक्षण असो घटनादुरुस्ती किंवा कायदेशीर मार्ग असतील सकारात्मक भूमिका घ्यावी असं सांगितलं असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
News English Summary: He gave us an idea to Prime Minister Narendra Modi about our 12 demands. They listened to our demands. Chief Minister Uddhav Thackeray has assured that Prime Minister Narendra Modi has given us a positive response and is aware of our demands.
News English Title: PM Narendra Modi has given us a positive response and is aware of our demands said CM Uddhav Thackeray news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार