21 November 2024 7:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कैऱ्या तोडल्या म्हणून अल्पवयीन मुलाला झाडाला बांधले | मारहाणीचा व्हिडिओ केला व्हायरल

Dalit community boy

जळगाव, ०८ जून | पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील अंजनविहिरे गावात 3 दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. कैऱ्या तोडल्या म्हणून शेतमालकासह त्यांच्या साथीदारांनीं दलित समाजातील एका अल्पवयीन मुलाला 2 तास झाडाला बांधून ठेवले. त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून तो व्हाट्सअपवर व्हायरल पण केला. धक्कादायक म्हणजे, शेतमालकाने त्या मुलाच्या अंगावर लघवी देखील केली. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात शेतमालकासह सालदारावर गुन्हा दाखल झाला असून, दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गोपी उर्फ विवेक रवींद्र पाटील व प्रवीण पावऱ्या अशी या घटनेतील संशयित आरोपींची नावे आहेत. दोघे अंजनविहिरे येथील रहिवासी आहेत. गोपी हा शेतमालक आहे तर प्रवीण हा त्याच्याकडे सालदारकी करतो.

या घटनेसंदर्भात पोलिसात दाखल तक्रारीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगा हा दलित समाजातील आहे. त्याचे कुटुंबीय उल्हासनगर येथे राहते. यावर्षी 12 वीच्या शिक्षणासाठी तो अंजनविहिरे येथे मामांकडे आलेला होता. 5 जून रोजी तो त्याच्या आजीची औषधी घेऊन गिरड गावातून घरी परत जात होता. रस्त्यात त्याने गोपी पाटील याच्या शेतातील झाडाच्या कैऱ्या तोडल्या. त्यावेळी सालदार प्रवीनने त्याला जाब विचारला. गोपीला त्याने फोन करून शेतात बोलावून घेतले. नंतर दोघांनी मुलाला मारहाण करत दोराच्या सहाय्याने चिकूच्या झाडाला बांधले. यावेळी गोपीने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला. तसेच त्याच्या पॅंटमध्ये व अंगावर लघवी केली. व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल केला. पुन्हा कैऱ्या तोडायला आला तर हातपाय तोडण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित मुलाने घडलेला प्रकार मामा व आजीला सांगितला. नंतर दुसऱ्या दिवशी 6 जूनला याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, संशयित आरोपींविरुद्ध ॲट्रोसिटी कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही संशयित आरोपींना अटक झाली आहे. या घटनेबाबत ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे म्हणाले की, पीडित मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मात्र, प्राथमिक तपासात संशयित आरोपींनी त्याच्या अंगावर लघवी केल्याचे स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे, असेही डॉ. मुंडे यांनी सांगितले.

 

News English Summary: An outrageous incident has come to light which has made progressive Maharashtra bow its head in shame. The incident took place 3 days ago in Anjanvihire village in Bhadgaon taluka of Jalgaon district. Farm owner along with the other farmer tied a minor boy from the Dalit community to a tree for 2 hours as he broke the Mango. He also made a viral video on WhatsApp by removing the video from his mobile. Shockingly, the farmer also urinated on the boy. A case has been registered against Saldar along with a farmer at Bhadgaon police station and both have been arrested by the police. The suspects in the case are Gopi alias Vivek Ravindra Patil and Praveen Pavarya.

News English Title: Jalgaon along with the farm owner tied a minor boy from the Dalit community to a tree for 2 hours as he broke the Mango news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x