21 April 2025 10:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Health First | कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मोड आलेली मटकी आहे उपयोगी

benefits of sprouted Matki

मुंबई, ०८ जून | मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे. तर मग जाणून घेऊयात मटकी खाण्याचे फायदे.

प्रोटीनचा स्त्रोत:
मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनांचा स्रोत आहे. तिच्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. जर तुम्ही शाकाहारी असाल किंवा डॉक्टरांनी तुम्हाला मांसाहार न करण्याचे सांगितले असेल तर शरीराला असणाऱ्या प्रथिनांची गरज मटकीच्या सेवनाने भरून निघते.

मलावरोध दूर होतो:
मलावरोधाची समस्या असल्यास आपल्या आहारात फायबरचे कमतरता असते. जर आपण आहारात मटकीचा समावेश केला तर त्यामुळे भरपूर प्रमाणात फायबर मिळते. त्यामुळे आपल्याला होणारा मलावरोधाचा त्रास कमी होतो.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते:
तज्ञांच्या मते, मटकीमुळे आपल्या शरीराला फायबर मिळते, त्यामुळे साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण राहते. भारतात किती प्रमाणात साखर असावी यावर फायबर नियंत्रण करतात. त्यामुळे डायबिटीसग्रस्तांनी मटकीचे सेवन केल्यास त्याचा भरपूर आरोग्यासाठी फायदा होतो.

ॲनिमिया पासून संरक्षण:
गरोदर महिला आणि मासिक पाळीत अतिरक्तस्राव होणाऱ्या महिलांना विशेषता ॲनिमियाचा धोका जास्त असतो. आहारात जास्त प्रमाणात आयर्न युक्त पदार्थांचा समावेश करणे हे ॲनिमिया होऊ नये यासाठी उपयोगी असतं. म्हणून मटकीमध्ये आयर्नचा स्त्रोत मोठ्या प्रमाणात असतो. म्हणून मटकी खाल्ल्याने ॲनिमिया होण्यापासून बचाव होतो.

रक्तदाब कमी होतो:
रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. हे कोलेस्टेरॉल कमी करण्याचे काम शरीरातील फायबर करते. तसेच मटकी तील पोटॅशियममुळे रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत चालतं त्यामुळे रक्तदाब कमी राहतो. मटकीमध्ये फायबरचे प्रमाण असल्यामुळे त्याचा फायदा होतो.

सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोग:
मटकीमध्ये आढळणारे प्रोटीन हे अमिनो ऍसिड युक्त असतात. त्यामुळे त्वचा सुंदर होण्यासाठी मदत होते. तसेच आपल्या त्वचेला झालेली जखम भरून काढण्यासाठी सुद्धा अमिनो ऍसिडचा उपयोग होतो.

म्हणून आपण घेत असलेल्या संतुलित आहारामध्ये जर मटकीचा पुरेसा प्रमाणात वापर केल्यास आपल्याला त्याचा आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात फायदा होऊ शकतो.

 

News English Summary: Sprouted Matki is a staple food in the Indian diet. Matki is sometimes eaten raw by soaking or even half-boiled. But we have the method of eating the most modified matki. This is because the properties of the potted pot increase. Matki is a very important cereal for health. So let’s learn the benefits of eating matki.

News English Title: Healthy benefits of sprouted Matki for lowering cholesterol news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या