22 November 2024 9:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | गाईचे तूप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहे का?

Cow ghee is beneficial

मुंबई, ०९ जून | तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत. तुपाचा मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो. ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास मेंदूच्या नसांना योग्य पोषण मिळते. शारीरिक प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पार पडाव्यात, यासाठी शरीर लवचिक असणं आवश्यक आहे. यासाठी व्यायामाप्रमाणेच पौष्टिक आहारातील घटक देखील तितकीच महत्त्वाची भूमिका निभावतात. शरीर लवचिक राहण्यासाठी शुद्ध तूप कशा पद्धतीने लाभदायक ठरते.

तुपाचे सेवन करणं आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरू शकते. तुपाच्या सेवनामुळे अन्य शारीरिक फायदे सुद्धा भरपूर प्रमाणात मिळतात. नियमित योग्य प्रमाणात तूप खाल्ल्यास आपल्या मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते, असे म्हणतात. आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, शुद्ध तूप हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.

तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते. तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते. हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते.

शरीर लवचिक राहण्यासाठी आपल्या स्नायूंना आवश्यक प्रमाणात नैसर्गिक स्वरुपात पोषण तत्त्वांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. सोबतच आपले हाडे देखील मजबूत असणं गरजेचं आहे. शरीराच्या या दोन्ही गरजा पूर्ण करण्यामध्ये तूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. म्हणूनच गायीच्या दुधापासूनच तयार केलेल्या तुपाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.

तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे. शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट राहते. कोरा या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना संकेत यांनी ही माहिती दिली.

 

News English Summary: There are many benefits to eating ghee. Ghee is also good for brain health. Which increases memory and concentration. Consumption of ghee on an empty stomach provides proper nutrition to the nerves of the brain. The body needs to be flexible so that the physical process can be carried out without any hindrance. For this, just like exercise, the components of a nutritious diet also play an important role. How pure ghee is beneficial for keeping the body flexible.

News English Title: Cow ghee is beneficial for health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x