Special Recipe | आरोग्यासाठी लाभदायक गुळपोळी | वाचा सविस्तर
मुंबई, ०९ जून | पारंपारिक पद्धतीने तयार करण्याती येणारी गुळपोळी आपल्या सर्वांनाच आवडते. काही खास सणांसाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही गुळपोळी फक्त चवीलाच उत्तम नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. गहू आणि गुळापासून तयार करण्यात आलेली ही हाय फायबर पोळी शरीरामधील आयर्नची कमतरता भासू देत नाही. तुम्ही ही पोळी तयार करताना तूप लावू शकता. जाणून घेऊया गूळपोळी तयार करण्याची पद्धत..
लागणारे साहित्य:
सारणासाठी, दीड कप शेंगदाणे, दीड कप खसखस दीड कप तेल, दीड किलो गूळ, एक कप बेसन, दोन सुक्या नारळाच्या वाट्या, ३/४ कप पांढरे तिळ, दिड कप मैदा, ३/४ कप कणिक, दोन टेस्पून तेल, चिमूटभर मिठ, दोन टेस्पून बेसन.
कृती:
चवीला छान आणि सुंदर अशी गुळपोळी बनवण्यासाठी स्टेप बाय स्टेप कृती करा.
- नारळाच्या वाट्या किसून घ्याव्यात. सोनेरी रंग येईपर्यंत कोरडेच भाजावे. हाताने चुरून घ्यावे. हा चुरा आपल्याला १/२ ते ३/४ कप हवा आहे.
- शेंगदाणे भाजून त्याची साले बाजूला करावीत आणि बारीक कूट करून घ्यावा.
- तिळ व खसखस स्वतंत्र, कोरडेच भाजून घ्यावे. बारीक पूड करून घ्यावी
- एका मध्यम पण जाड बुडाच्या पातेल्यात दीड कप तेल गरम करावे. त्यात एक कप बेसन खमंग भाजून घ्यावे.
- गूळ बारीक किसणीवर किसून घ्यावा. सर्व भाजलेल्या गोष्टी तिळ, खसखस, शेंगदाणे, बेसन, सुकं खोबरं गूळामध्ये घालून मळून घ्यावे आणि घट्ट गोळा करावा.
- मैदा, कणिक, मिठ आणि बेसन एकत्र करावे. दोन टेस्पून तेल कडकडीत गरम करून पिठात घालावे. पाणी घालून मध्यमसर घट्ट गोळा भिजवावा. लागल्यास थोडे साधे तेल घालावे. १५ मिनीटे झाकून ठेवावे.
- सारणाचे २३ ते २५ सारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे.
- आवरणासाठी आपल्याला ‘एक सारण गोळ्याला दोन पिठाचे गोळे’ हवे आहेत त्यानुसार सारणाच्या गोळ्यापेक्षा जरा लहान असा पिठाचा गोळा करावा.
- दोन पिठाच्या लाट्यामध्ये एक सारणाचा गोळा भरून लाटीच्या कडा सिल करून बंद करावा. हाताने हलके दाबून थोड्या कोरड्या पिठावर पोळी लाटावी. गुळाची पोळी एका बाजूनेच लाटावी, बाजू पलटू नये.
- मध्यम तवा तापवून दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्याव्यात. कागदावर काढून किंचीत गार होवू द्याव्यात. एकदम गरम खावू नये, सारणातील गूळ गरम असल्याने चटका बसू शकतो.
- गुळपोळी गार किंवा कोमट दोन्हीप्रकारे छान लागते. गुळपोळीवर नेहमी थोडे तूप घालून खावे म्हणजे उष्ण पडत नाही.
फायदे:
गुळपोळीतून भरपूर कॅलरीज मिळतात. कमी खाल्ले तरी शक्ती भरपूर मिळते. प्रतिकारशक्ती वाढते. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत होते. अशक्तपणा कमी होतो. थंडीत खायला मजा येते. आरोग्याला लाभदायक असते.
News English Summary: We all love the traditional way of making gulpoli. This dish is made for some special festivals. This sweetness is not only good for taste but also very beneficial for health. This high fiber bread made from wheat and jaggery does not cause iron deficiency in the body. You can add ghee while making this poli.
News English Title: Gul Poli recipe jaggery bread iron deficiency will be removed health news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार