13 November 2024 1:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

आज शनी जयंती | याच दिवशी लागेल सूर्यग्रहण | जाणून घ्या काय करावं काय करू नये? - सविस्तर वाचा

Shani Jayanti

मुंबई, 10 जून | न्यायाची देवता अशी शनि देवाची ओळख आहे. यंदा १० जून २०२१ रोजी शनी जयंती (Shani Jayanti) आहे. याच दिवशी म्हणजे गुरुवार १० जून २०२१ रोजी सूर्यग्रहण (solar eclipse) आहे. श्रद्धाळूंचा असा विश्वास आहे की शनिदेव प्रत्येक सजिवाला कर्माप्रमाणे फळ देतो. हे फळ कधी आणि कसे द्यायचे याचा निर्णय शनिदेव घेतो. कोणाचेही कर्म शनिदेवापासून लपून राहूशकत नाही. यामुळेच शनिदेवाची कृपा राहावी यासाठी दर शनिवारी आणि शनी जयंतीच्या दिवशी शनिची मनोभावे पूजा करतात. यंदाची शनि जयंती वृषभ, वृश्चिक आणि मीन राशीसाठी लाभाची आहे. पण सर्व बारा राशींच्या नागरिकांनी शनिदेवाची कृपा राहावी यासाठी शनिची मनोभावे पूजा करावी असे आवाहन ज्योतिषांनी केले आहे.

सूर्यूपुत्र असल्याने भगवान शनीदेव जयंतीवर सूर्य ग्रहणाचे परिणाम जास्त होणार नाही. देशात याची उपछाया असणार आहे. यासह नागरिकांनी ग्रहणकाळात काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. गोपीनाथ मंदिराचे प्रमुख पुजारी पंडित दीनद्याल शास्त्री सांगतात की, देशात सूर्यग्रहणाचा अधिक प्रभाव राहणार नाही. परंतु संपूर्ण ब्रह्मांडमध्ये लागणारे सूर्यग्रहणाच्या काळादरम्यान देवाची आराधना केली पाहिजे.

भगवान शनी देव जयंतीचे मुहूर्त:
9 जून उशिरा रात्री 2.25 पासून ते 10 जून 4.24 वाजेपर्यंत

सूर्य ग्रहणाच्या सूतकाची वेळ:
दुपारी 1.42 पासून सांयकाळी 6.41 वाजेपर्यंत

श्राद्ध, तर्पण व पिंडदानासाठी चांगला दिवस:
शास्त्रानुसार, भगवान शनी देव जयंती हा दिवस श्राद्ध, तर्पण, पिंडदान आणि दान पुण्यासाठी चांगला आहे. यादरम्यान गरजू लोकांना तसेच गरीब लोकांना धान्य दिले पाहिजे. यासह फळांचे वृक्ष लावल्यास आपल्याला अधिक फळे मिळतात. याविषयी ज्योतिषाचार्य आचार्य नरेश नाथ म्हणतात की, भगवान शनिदेव जयंतीला स्वच्छ मानाने आराधना करावी. यादिवशी भगवान शनी देवासह भगवान हनुमान चालीसाचे वाचन करावे.

न्याय देवता भगवान शनी देव:
भगवान शनीदेवाला न्याय देवता म्हटलं जातं. यादिवशी दारू प्यायल्याने, जुगार खेळणे, खोटं बोलण्याने व्यक्तीच्या पापात वाढ होते. शनीदेवाला या गोष्टी बिलकूल मान्य नाहीत.

भगवान शनीदेवाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी:

  • दुसऱ्यांविषयी वाईट बोलू नये.
  • खोटं बोलू नये.
  • कर्जाने पैसे घेऊ नये.
  • वडिलधाऱ्यांचा अपमान करू नये.
  • स्त्रियांच्या सन्मानाला ठेस पोहचेल असे वागू नये.

भगवान शनीदेवाच्या जयंतीच्या दिवशी हे करा:

  • भगवान भैरवला कच्च दूध अर्पण करावं.
  • कावळ्याला भाकरी खाऊ घाला.
  • सफाई कर्मचाऱ्यांची सेवा करावी.
  • हनुमान चालीसाचं वाचन करावं.
  • उडीद, लोखंड, तेल, काळेकपडे, काळ्या रंगाची गाय, काळ्या रंगाचे बूट, दान करावेत.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x