24 November 2024 5:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

देशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी

PM Narendra Modi

नवी दिल्ली, 10 जून | देशात सत्ता आल्यापासून भाजपचा खजिना तुडुंब भरल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, २०१९-२० मध्ये भारतीय जनता पक्षाला कॉर्पोरेट आणि व्यक्तिगत स्वरुपात तब्बल ७८५ कोटी देणगी मिळालं आहे. काँग्रेस पक्षाला १३९ कोटी रुपये देणगी मिळाली आहे. याचा अर्थ काँग्रेसच्या ५ पट जास्त भारतीय जनता पक्षाला देणगी मिळाली आहे. तर याच कालावधीत एनसीपीला ५९ कोटी, टीएमसी (TMC) ८ कोटी, सीपीएम १९.६ कोटी आणि सीपीआय १.९ कोटी रुपये देणगी मिळाली आहे.

भारतीय जनता पक्षाचे खासदार राजीव चंद्रशेखर यांच्या ज्युपिटर कॅपिटल, आयटीसी ग्रुप, रियल इस्टेट कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्स( लोढा) आणि बी.जी शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी, प्रूडेंट इलेक्ट्रोल ट्रस्ट आणि जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट यांचा भारतीय जनता पक्षाच्या देणगीदारांच्या यादीत समावेश आहे. २०१९-२० मध्ये प्रुडेंट इलेक्टोरल फंडच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला २१७.७५ कोटी रुपये देणगी मिळाली. तर जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्टकडून ४५.९५ कोटी मिळाले आहेत.

ज्युपिटर कॅपिटलकडून १५ कोटी, आयटीसी ग्रूप ७६ कोटी. मॅक्रोटेक डेव्हलपर्स २१ कोटी तर गुलमर्ग रियलटर्सकडून २० कोटी मिळाले आहेत. बी.जी शिर्के टेक्नोलॉजीकडून भारतीय जनता पक्षाला ३५ कोटींची देणगी मिळाली आहे. भारतीय जनता पक्षाला ऑक्टोबर २०१९ मध्ये बांधकाम व्यावसायिक सुधाकर शेट्टी यांच्या रियल इस्टेट कंपनी गुलमर्ग रियल्टर्सकडून २० कोटी रुपये देणगी मिळाली होती. याची माहिती मिळाल्यानंतर ईडीनं जानेवारी २०२० मध्ये सुधाकर शेट्टी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर छापा मारला होता.

 

News English Summary: According to the Election Commission, the BJP has received Rs 785 crore in corporate and individual donations in 2019-20. The Congress party has received a donation of Rs 139 crore. This means that the Bharatiya Janata Party has received 5 times more donations than the Congress. During the same period, NCP received Rs 59 crore, TMC Rs 8 crore, CPM Rs 19.6 crore and CPI Rs 1.9 crore.

News English Title: Report on political Party donations where BJP got Rs 750 crore in 2019 20  over 5 times what Congress got news updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x