Health First | जाणून घ्या खसखशीचे आरोग्यवर्धक गुणधर्म । नक्की वाचा
मुंबई १० जून : आपल्या भारतीय जेवणात मसाल्यासाठी वापरला जाणारा एक महत्वाचा घटक म्हणजे खसखस. इंग्लिशमध्ये याला ‘पॉपी सीड्स’ म्हणतात. खसखस म्हणजे या पॉपीच्या झाडांच्या बिया.पण त्याव्यतिरिक्त सुद्धा तिचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत.प्राचीन काळापासून खसखस दुखण्यावर उपाय म्हणून वापरली जाते.पूर्वी रडणाऱ्या बाळांना थोडी खसखस मधातून देण्याची पद्धत होती.ज्यामुळे ती शांत होत असत. आता खसखस अशाप्रकारे वापरली जात नसली तरी तिचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
1. खसखस ही वेदना कमी करण्यासाठी म्हणून वापरले जाते. त्यात आढळणारे ओपियम अल्कलॉइड्स सर्व प्रकारच्या वेदना दूर करण्यात महत्वाची भूमिका निभावतात.विशेषतः,हे स्नायूंच्या वेदनांमध्ये वापरले जाते. बाजारात खसखशीचे तेल देखील उपलब्ध आहे, जे वेदना असलेल्या जागे वर वापरले जाते.
2 . श्वसनाच्या समस्येमध्ये देखील खसखशीचा वापर करणे फायदेशीर आहे.हे खोकला कमी करून श्वसन समस्येमध्ये दीर्घकालीन आराम देण्यास देखील मदत करते.
3. आपण झोपेच्या समस्येमुळे त्रासलेले आहात तर झोपण्याच्या पूर्वी खसखशीचे गरम दूध पिणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे निद्रानाशची समस्या दूर करते. हे आपल्याला झोपेसाठी प्रेरित करेल.
4. खसखस फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे, याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होत नाही. या व्यतिरिक्त हे पचनक्रिया चांगली होण्यास मदत करते आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
5 . किडनीच्या स्टोन मध्ये देखील हे उपचार म्हणून वापरतात.या मध्ये आढळणारे ऑक्सिलेट शरीरातील अतिरिक्त कॅल्शियम शोषून किडनीमध्ये स्टोन होण्यापासून प्रतिबंधित करते.
6. खसखस मानसिक तणाव दूर करण्यात तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स आढळतात. जे आपल्याला आपले तारुण्य राखण्यास मदत करतात.
7. खसखस त्वचेला ओलावा देण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यामुळे त्वचेची जळजळ आणि खाज कमी होते.तसेच एक्झिमा सारख्या समस्यांशी लढण्यात मदत होते.
8 . ओमेगा -6 फॅटी ऍसिड्स, प्रोटीन, फायबरने खसखस समृद्ध असण्यासह या मध्ये फायटोकेमिकल्स, व्हिटॅमिन बी, थायमिन, कॅल्शियम आणि मॅंगनीज देखील आढळते. जे पौष्टिकदृष्ट्या फायदेशीर असतात.
9 . त्वचा सुंदर करण्यासाठी, खसखस एक फेसपॅक म्हणून वापरला जातो हे दुधामध्ये वाटून वापरले जाते. हे त्वचेला ओलावा प्रदान करते तसेच चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक आणतो आणि चेहरा उजाळतो.
10 . या व्यतिरिक्त अति आवश्यक लहान लहान समस्या जस की जास्त तहान लागणे,ताप येणे,सूज येणे,पोटातील जळजळ पासून मुक्ती मिळविण्यासाठी खसखस वापरतात.हे पोटातील उष्णता शांत करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
News English Summary: An important ingredient used in our Indian cuisine is poppy. In English it is called ‘Poppy Seeds’. Poppy seeds are the seeds of this poppy plant. But other than that, it also has many health benefits. Poppy has been used as a remedy for pain since ancient times. Although poppy is no longer used in this way, it has many health benefits.
News English Title: Poppy seeds are beneficiary to health news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार