22 November 2024 7:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

या योजनानेत मिळेल दरमहा १४,००० पर्यत पेन्शन | जाणून घ्या गुंतवणुक विषयी

Lic Pension Scheme

मुंबई, 10 जून | निवृत्तीनंतर नियमित पेन्शन आणि आर्थिक सुरक्षितता ही प्रत्येकच नागरिकाची अपेक्षा असते. असा गुंतवणूक प्रकार ज्यामध्ये पैसेही सुरक्षित राहतील आणि चांगला परतावादेखील मिळेल तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाची म्हणजेच एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसी हा एक चांगला पर्याय आहे. या पॉलिसीत तुम्हाला एक निश्चित पेन्शन मिळते. या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला फक्त एकदाच प्रिमियम भरावा लागेल. या पॉलिसीत तुम्हाला एकूण १० पर्याय उपलब्ध आहेत. मात्र यातील ‘पर्याय अ’ निवडल्यावर तुम्हाला दर महिन्याला १४,००० रुपयांपर्यतचे मासिक पेन्शन मिळू शकते.

वयाची अट:
जीवन अक्षय पॉलिसी ग्राहकाचे वय ३० वर्षांपासून ते ८५ वर्षापर्यत असू शकते. यामध्ये किमान १ लाख रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जीवन अक्षय पॉलिसीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करता येते. ही एक सिंगल प्रिमियम असणारी नॉन-लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल अॅन्युईटी स्कीम आहे.

जीवन अक्षय पॉलिसीचे फायदे:

  • या पॉलिसीअंतर्गत तुम्हाला कर्जाचीदेखील सुविधा मिळते. तुम्ही पॉलिसी घेतल्यानंतर तीन महिन्यांनी कर्ज घेऊ शकता.
  • जर एखाद्या ग्राहकाने या पॉलिसीत ५ लाख रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक केली तर त्याला अॅन्युईटीमध्ये इन्सेन्टिव्हदेखील मिळतो.
  • जीवन अक्षय पॉलिसीत वार्षिक, सहामाही, तिमाही आणि दर महिन्याला गुंतवणूक करता येते. यात किमान अॅन्युईटी वार्षिक १२,००० रुपये आहे. कमाल रकमेसाठी मात्र कोणतीही मर्यादा नाही.
  • जीवन अक्षय पॉलिसीच्या जीवनभर एकाच दराने अॅन्युईटी मिळण्याच्या पर्यायाला निवडून या पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करून तुम्ही दरमहा पेन्शन मिळवू शकता.

 

News English Summary: Regular pension and financial security after retirement is the expectation of every citizen. If you want a type of investment in which money is safe and returns are good, then Life Insurance Policy of Life Insurance Corporation of India (LIC) is a great option for you. With this policy you get a fixed pension. The feature of this plan is that you only have to pay premium once. There are 10 options available to you in this policy.

News English Title: Life Insurance Corporation Jeevan Akshay scheme to get pension up to 14 thousand rupees news updates.

हॅशटॅग्स

#Money(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x