22 November 2024 3:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

BREAKING | ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्कची गरज नाही - केंद्र सरकार

India corona pandemic

नवी दिल्ली, ११ जून | देशात तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवर पालकांची काळजी प्रचंड वाढली आहे. तसेच दुसरी लाट ओसरू लागली असली तरी केंद्र सरकारने लहान मुलांच्या बाबतीत नव्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालणे आवश्यक नाही, असे देशाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने (डीजीएचएस)ने नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच कोरोनाची बाधा झालेल्या १८ वर्षे वयाखालील मुलांना रेमडेसिविर औषध देऊ नये, असेही या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.

पुढे संचालनालयाने सांगितले की, ६ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांनी पालक आणि डॉक्टर यांच्या देखरेखीखाली मास्क वापरण्यास हरकत नाही. १८ वर्षे वयाखालील मुलांमध्ये कोरोनाचा होणारा फैलाव रोखण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना स्टेरॉईड्स देणे हे हानीकारक ठरू शकते. त्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या, कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्या तसेच प्रकृती गंभीर असलेल्यांवरच स्टिरॉईड्सचा वापर केला जावा.

वापर योग्य वेळी, योग्य प्रमाणात व योग्य कालावधीसाठी करण्यात यावा, असे या आरोग्य सेवा संचालनालयाने म्हटले आहे. रुग्णाची प्रकृती पाहून त्याची एचआरसीटी करावी किंवा न करावी याचा निर्णय उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घ्यावा असेही या नव्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे.

 

News English Summary: Parents are worried about the possibility of a third wave in the country. Although the second wave has begun to recede, the central government has issued new guidelines for children. According to the new guidelines, the country’s Directorate of Health Services (DGHS) has made it mandatory for children aged 5 and under to wear masks. The guidelines also state that children under the age of 18 with coronary artery disease should not be given remedicivir.

News English Title: Parents are worried about the possibility of a third wave in the country news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x