22 November 2024 9:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

युपी विधानसभा निवडणुकीपूर्वी यूपीचे विभाजन? पूर्वांचल राज्याची स्थापना हेच दिल्ली वारीचं कारण ? - सविस्तर वृत्त

Uttar Pradesh Assembly Election 2022

नवी दिल्ली, ११ जून | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. तत्पूर्वी, योगी गुरुवारी अचानक दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे दीड तास चालली. आता त्यांची पंतप्रधानांशीही बैठक होणार आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात ताणतणाव वाढल्याची चर्चा आहे. राजकीय क्षेत्रात याकडे यूपीत नेतृत्व परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून पाहिले जात असले तरी मूळ कारण वेगळेच आहे. प्रसार माध्यमांच्या सूत्रांनुसार, पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी यूपीचे विभाजन करून वेगळे पूर्वांचल राज्य निर्माण करण्यावर भाजप नेतृत्व विचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय व माजी नोकरशहा ए. के. शर्मा यांना उत्तर प्रदेशात पाठवण्यामागे हाच उद्देश असल्याचे मानले जाते. शर्मा सध्या पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघाचे व्यवस्थापन पाहत आहेत.

काहींच्या मते, पूर्वांचल राज्य स्थापन झाले तर योगींचा गोरखपूर मतदारसंघ नव्या राज्यात जाईल. १९९८ ते २०१७ पर्यंत योगी येथे खासदार होते. योगी गोरक्षपीठाचे महंतही आहेत. याचे केंद्र गोरखपूरच आहे. पूर्वांचलमध्ये २३ ते २५ जिल्हे आणि १२५ विधानसभा जागा समाविष्ट असू शकतात. मात्र, या प्रस्तावास योगी समर्थकांचा विरोध आहे. पूर्वांचलसह अवध प्रदेश, बुंदेलखंड आणि पश्चिम प्रदेशात उत्तर प्रदेशचे विभागणी करण्याचा प्रस्ताव मायावती यांच्या कार्यकाळात २०११ मध्ये केंद्राला पाठवण्यात आला होता. मात्र, त्यावर नंतर कधीच विचार झाला नाही.

राजधानी दिल्लीत राजकीय भेटीगाठींचा सिलसिला वाढला:
आदित्यनाथ यांनी गुरुवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शुक्रवारी सकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. काँग्रेस नेते जितिन प्रसाद भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी योगींचा हा दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मोदींची भेट घेतली. अपना दलच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनीही शहा यांची भेट घेतली. यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी १२ जूनपर्यंत आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

 

News Summary: Tensions have risen between Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath and the BJP’s central leadership. In the political arena, this is seen as a change of leadership in UP, but the root cause is different. According to sources, the BJP leadership is considering creating a separate eastern state by dividing UP before next year’s assembly elections. Prime Minister Narendra Modi’s close and former bureaucrat A. K. This is believed to be the motive behind sending Sharma to Uttar Pradesh. Sharma is currently managing the Prime Minister’s Varanasi constituency.

News Title:  Uttar Pradesh Assembly Election 2022 Establishment of the eastern state is the cause of the Yogi Adityanath Delhi will meet PM Modi today news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x