24 November 2024 8:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Health First | टोमॅटो खाण्याचे ‘हे’ मोठे आरोग्यदायी फायदे | नक्की वाचा

Tomato Benefits

मुंबई, ११ जून | रोजच्या जेवणामध्ये टोमॅटोचा वापर करतो. लाल लाल रंगाचे टोमॅटो जेवणाची चवच नाही वाढवत तर त्याचे अनेक फायदे ही आहेत. टोमॅटोचा वापर आपण किचनमध्ये रेसिपी करायला, टोमॅटो केचअप, टोमॅटो सूप, सलड, टोमॅटोची भाजी असे विविध पदार्थ तयार करतो. टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर भरपूर असतात.

आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये टाकला जातो. भाजी किंवा आमटी शिवाय कोशिंबीरी, सॉस आणि सूप म्हणून देखील टोमॅटोचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त एक नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून देखील तो उपयुक्त ठरतो. टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक पर्याप्त प्रमाणात आढळतात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, दररोज एक टोमॅटो खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

  1. टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात.
  2. टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. तसंच टोमॅटो कॅल्शिअम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि झिंक यासारख्या तत्त्वांनी युक्त असतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात,
  3. टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यानंतर अजून प्रभावकारक ठरतो.
  4. टोमॅटोमध्ये कर्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असते. यामुळे हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटो गुणकारी आहे. यामुळे दररोज टोमॅटो खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
  5. वजन कमी करायचे असेल तर टोमॅटो खाणे खूप फायदेशीर आहे. आपण एक टोमॅटो खाल्ले तर बऱ्याच वेळ भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखे वाटते.
  6. ज्यांना वजन कमी करायचे आहे अशांनी दररोज सकाळी टोमॅटो खाल्ले पाहिजे.
  7. व्हिटामिन एची मात्रा असल्याने टोमॅटो डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.

महत्वाची टीप: कोणतेही महत्वाचे उपचार घरी करण्यापूर्वी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

News Summary: Uses tomatoes in daily meals. While red tomatoes do not enhance the taste of the meal, they have many benefits. We use tomatoes to make recipes in the kitchen, tomato ketchup, tomato soup, salad, tomato vegetable. Tomatoes are rich in protein, vitamins, minerals and fiber.

News Title: Eating tomato benefits for health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x