22 November 2024 3:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | फिटकरीचे 7 आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का? | वाचा सविस्तर

Amazing uses of alum

मुंबई, १२ जून | पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुरटीचे अनेक फायदे आहेत. यात एंटी-बैक्टीरियल गुण आढळतात. जाणून घ्या तुरटीचे फायदे.

* तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते. मॅग्नेशियममुळे शरीरातील हानिकारक पदार्थ निघून जातात. तणाव दूर करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून अंघोळ केल्याने आराम वाटतो. याने बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. याने शरीराला दुर्गध येत असल्याचा त्रास देखील दूर होतो.

* शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर त्या फिटकरीच्या पाण्याचा शेक दिल्याने दुखणे बरे होते.

* शरीरावर एखादा घाव अथवा जखम झाली असेल तर त्यावर तुरटीचा उपयोग केल्याने जखम बरी होण्यास मदत होते. यामध्ये अस्ट्रिन्जन्ट आणि हेमोस्टेटिक गुण असल्याने जखम लवकर बरी होते. एका ग्लास गरम पाण्यात एक चमचा तुरटी पावडर मिसळून पाणी कोमट झाल्यावर जखम धुवावी.‍ दिवसातून दोन ते तीन वेळा असे करु शकता.

* दातांची समस्या असेल तर तुरटीच्या पाण्याने रोज चूळ भरावी. याने तोंडातील बॅक्टेरियांचा नाश होतो व तोंडाला दुर्गंध येण्याची समस्या देखील नाहीशी होते.

* शेव्हिंग नंतर लोशन वापरण्याऐवजी तुरटी प्रभावी असते. याने त्वचा मऊ होण्यास मदत होते. शेव्हिंगनंतर तुरटीचा खडा फिरवावा व दोन मिनिटाने थंड पाण्याने चेहरा धुवुन घ्यावा.

* पाय फाटण्याची समस्या असल्यास नियमितपणे तुरटीचा तुकडा पाय ओले करून त्यावर घासावा. याने ही समस्या लवकरच बरी होईल.

* केसांमधील ऊवा घालवण्यासाठी तुरटीच्या पावडरमध्ये थोडे पाणी मिसळून मिश्रण तयार करा. ही पेस्ट केसांना स्काल्पपासून लावा. ऊवांचा त्रास नाहीसा होईल.

 

News Title: Amazing uses of alum health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x