22 November 2024 3:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | भीतीदायक स्वप्न का पडतात हे तुम्हाला माहित आहे का ? - वाचा सविस्तर

nightmares happen

मुंबई, १२ जून | भयावह स्वप्नांपासून सुटका करून घेणे शक्य आहे? झोपेत पडणारी स्वप्ने टाळता येणे शक्यच नाही, असा समज कित्येक वर्षांपासून रूढ आहे. मात्र कदाचित ते तसे नाही. नुकत्याच झालेल्या संशोधनानंतर हे सिद्ध झाले आहे की, आपण वाईट स्वप्नांच्या संख्येला आवर घालू शकतो. त्यांचे विषयही बदलू शकतो. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (पेंटागॉन) या संशोधनावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. अफगाणिस्तान आणि इराकमधून परतलेल्या अमेरिकी लष्करी अधिकारी आणि सैनिकांना निद्रानाशाने ग्रासले आहे. बहुतेकांना युद्धाशी संबंधित वाईट स्वप्ने पडत आहेत. त्यामुळेच पेंटागॉनला अशा स्वप्नांचा अभ्यास करण्याची गरज भासत आहे.

भयावह स्वप्नांची संख्या आणि त्यांची तीव्रता कशी कमी करता येईल, याचा शोध पिटर्सबर्ग विद्यापीठातील स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये घेण्यात येत आहे. या प्रकल्पावर 22.19 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. शिवाय राष्ट्रीय आरोग्य संस्थेमध्येही भयावह स्वप्ने आणि त्यांच्या दुष्परिणामांवर शास्त्रीय संशोधन सुरू आहे. सुमारे 60 लाख अमेरिकी नागरिकांना भयावह स्वप्नांच्या समस्येने ग्रस्त झालेले आहेत.

स्वप्नांवर झालेल्या ताज्या संशोधनाने जुने सिद्धांत खोेटे ठरवले आहेत. सिग्मंड फ्रॉइडच्या सिद्धांतानुसार, स्वप्ने ही अतृप्त कामेच्छा, पालन-पोषणाकडे दुर्लक्ष किंवा चिंता यांचे संकेत आहेत. आता हा सिद्धांत बाद झाला आहे. नव्याने मांडण्यात आलेल्या थेअरीनुसार चांगली किंवा वाईट स्वप्ने ही मानसिक आजारांचे नव्हे तर प्राथमिक स्वरूपातील मानसिक विकारांचे लक्षण आहे.

प्रत्येक व्यक्तीला झोप लागल्यानंतर स्वप्न पडतात. यापैकी काही स्वप्न चांगली असतात तर काही स्वप्न ही फार भीतीदायक असतात. भीतीदायक स्वप्नांमुळे आपण झोपेतून लगेच जागे होतो. झोपेतून जागं झाल्यानंतरही पडलेल्या स्वप्नाची थोडीशी भीती मनाला वाटत असते. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की भितीदायक स्वप्न आपल्याला का पडतात? तर आजच्या आर्टिकलमधून जाणून घेऊया की आपल्याला भीतीदायक स्वप्न का पडतात.

भीतीदायक स्वप्न का पडतात?
ज्या स्वप्नांना पाहिल्यानंतर आपण उदास होतो किंवा तुम्हाला भीती वाटते त्यांना भीतीदायक स्वप्न म्हणजेत नाईटमेअर म्हटलं जातं. अशी स्वप्न पडणं आपल्या भावना आणि आठवणींना सामोरे जाण्यासाठी मेंदूचा एक प्रतिसाद असू शकतो.

यासंदर्भात सायन रूग्णालयाच्या सायकॅट्री विभागातील तज्ज्ञ म्हणाले, “व्यक्तीच्या दबलेल्या इच्छा आणि काही गोष्टी स्वप्नांच्या माध्यमातून व्यक्त होतात. अनेकदा लोकांच्या मनात विविध गोष्टींविषयी चिंता असतात. या चिंता आणि ताणतणावामुळे भीतीदायक स्वप्न पडण्याची शक्यता असते.”

तज्ज्ञ डॉक्टर पुढे म्हणाले, “काही डिसॉर्डर जसं की, पोस्ट ट्रॉमेटीक स्ट्रेस डिसॉर्डर आणि नाईटमेअर डिसॉर्डर यामुळेही भीतीदायक स्वप्न पडू शकतात. अशा व्यक्ती उपचारांसाठी आल्यानंतर त्यांना औषधं किंवा समुदेशन करण्यात येतं.”

आपल्याला स्वप्न का पडतात?
आपल्या झोपेचे अनेक टप्पे असतात. ज्यामध्ये रॅपिड आय मूव्हमेंट एक असतो. या टप्प्यामध्ये व्यक्ती फार गाढ झोपेत असतो. आणि याच कालावधीत स्वप्न पाहण्याची शक्यता अधिक असते. स्वप्नांच्या संबंधात अनेक वैज्ञानिक थियरी आहेत.

एका थियरीच्या माध्यमातून, झोपेत असताना देखील आपलं डोकं सक्रिय असतं. मात्र त्यावेळी त्याच्या लॉजिकल सेंटर ऐवजी इमोशनल सेंटर अधिक कार्यरत असतात. त्यामुळे जीवनातील ज्या भावनात्मक विचारांवर आणि परिस्थितीवर आपण झोपेत नसताना लक्ष देत नाही त्या विचारांशी आणि परिस्थितीशी संबंधित स्वप्न आपल्याला पडतात.

 

News Title: Do you know about why nightmares happen health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x