22 November 2024 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

गुजरात विधानसभा २०२२ | ‘आप’च्या पक्षविस्तारासाठी मुख्यमंत्री केजरीवाल गुजरातमध्ये

Gujarat assembly election 2022

अहमदाबाद, १४ जून | मागील आठवड्यात राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे देशात तिसरी आघाडी निर्माण होण्याच्या हालचाली सुरू होणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु, त्याच वेळी आम आदमी पार्टीने आगामी गुजरात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना पहिला धक्का बसला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

2022मध्ये गुजरात विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोठं विधान केलं आहे. केजरीवाल यांनी गुजरात विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. केजरीवाल आज एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

२०२२ मध्ये आम्ही स्थानिक जनतेच्या मुद्द्यांवरून निवडणूक लढवू आणि चेहरादेखील इथलाच असेल,’ अशी महत्त्वाची घोषणा केजरीवाल यांनी केली. ‘भाजप आणि काँग्रेस सरकारांच्या कारस्थानांमुळे आज गुजरातची ही अवस्था आहे. मागील २७ वर्षांपासून गुजरातमध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे. २७ वर्षांपासून भाजप आणि काँग्रेसची मैत्री आहे. काँग्रेस भारतीय जनता पक्षाच्या खिशात आहे. भारतीय जनता पक्षाच्या गरजेनुसार काँग्रेसकडून पुरवठा केला जातो,’ अशा शब्दांत केजरीवालांनी गुजरातमधील काँग्रेस, भारतीय जनता पक्षाच्या राजकारणावर तोंडसुख घेतलं.

 

News Title: AAP to contest on all seats in Gujarat assembly 2022 polls says Chief minister Arvind Kejriwal news updates.

हॅशटॅग्स

#GujaratAssemblyElection2022(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x